माहिती आणि प्रसारण मंत्रालय
21 जून 2022 या आंतरराष्ट्रीय योग्य दिनाच्या उलटगणतीनुसार 39 व्या पूर्व दिनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबईतल्या कार्यालयानं केलं योग शिबीर आयोजित
Posted On:
13 MAY 2022 6:39PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मे 2022
पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीनुसार आजच्या 39 व्या दिवशी योग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
योग प्रशिक्षक आणि योग अभ्यासक श्री विश्वनाथ साहा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा सराव केला.
श्री विश्वनाथ साहा यांनी स्वामी शिवानंद सरस्वती विद्यालयातून योगसाधनेचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी अनेक योग शिबिरांचे आयोजन केले आहे. तसंच त्यांनी गेली दोन दशके आरोग्य, निरामयता आणि फिटनेस या क्षेत्रात देशासह जगभरात अनेक ठिकाणी कार्य केले आहे.
आजच्या सत्राची सुरुवात श्वासोच्छवासाच्या योग्य तंत्रांचे महत्त्व, अनुलोम-विलोम या विषयावरील भाषणाने झाली. त्यानंतर आरोग्यासाठी लाभदायी विशिष्ट योगासनांची प्रात्यक्षिकं झाली.
“प्रत्येक योगिक क्रिया ही लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि सुसंवाद साधण्याची गुरुकिल्ली आहे”,असं योगगुरू श्री विश्वनाथ साहा म्हणाले.
पी आय बी मुंबई भारतीय प्राचीन योग कलेच्या लाभांविषयी योग तज्ज्ञांनी लिहिलेल्या लेखांद्वारे आणि देशभरात योगाशी संबंधित सर्व आयुष मंत्रालयाच्या कार्यक्रमांच्या वृत्तांकनाच्या माध्यमातून माहितीचा प्रसार करून जनजागृती करणार आहे.
योग वर्षादरगणिक अधिक समृद्ध होत आहे; किंबहुना शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी आजकालचा मानक (ट्रेंडसेटर) बनला आहे. यंदाच्या योग दिनी 100 टक्के नाशवंत असेेजैविक योग मॅट्स ( बायोडिग्रेडेबल योग मॅट्स) वापरावेत अशी सूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.
सामान्य योग प्रोटोकॉल आणि आंतरराष्ट्रीय योग दिन, 2022 च्या उलटमोजणीशी (काउंटडाउनशी) संबंधित कार्यक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी https://yoga.ayush.gov.in/ ला भेट द्या.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825172)
Visitor Counter : 120