वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-संयुक्त अरब अमिराती स्टार्टअप पूल
Posted On:
13 MAY 2022 6:02PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मे 2022
- जागतिक आर्थिक व्यवस्थेत एक महत्त्वाचा करार असलेल्या, भारत-संयुक्त अरब अमिराती सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सीईपीए ) या करारावर 18 फेब्रुवारी 2022 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या आभासी उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
- सीईपीए कराराच्या 13 व्या प्रकरणाअंतर्गत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (एसएमई) लक्ष केंद्रित करून, उभय देशांच्या या कार्यक्षेत्रातील सहकार्याला चालना देणे हे एक प्रमुख लक्ष्य आहे.
- सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीद्वारे, प्रवेगक, इनक्यूबेटर आणि इतर अशा कार्यक्षेत्रामधील हितसंबंधीतांच्या बळकट संबंधांच्या माध्यमातून ,स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी, सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने, या कराराच्या कलम 13.2 मध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा संकल्प मांडण्यात आला आहे.
- आज सुरू झालेला 'भारत -संयुक्त अरब अमिराती स्टार्टअप पूल 'हाच दृष्टिकोन प्रत्यक्षात आणतो.हा पूल वन स्टॉप प्लॅटफॉर्म म्ह्नणजेच एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मंचाच्या स्वरूपात कार्य करेल. या मंचाद्वारे भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातीमधील स्टार्टअप कार्यक्षेत्राची माहिती उभय देशांतील उद्योजक आणि हितसंबंधितांना सहज उपलब्ध होईल.
- गेल्या काही वर्षांपासून असलेले उभय देशांमधील जवळचे संबंध या पुलामुळे दृढ झाले आहे.
- स्टार्टअप पूल खालील सुविधा उपलब्ध करून देईल:
- इनक्यूबेटर्सची क्षमता बांधणी करणे : देशभरात अस्तित्वात असलेल्या 750 हून अधिक इनक्यूबेटर्ससह भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर सर्वात बळकट स्टार्टअप समर्थित पायाभूत सुविधा आहेत. हा पूल भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील इनक्यूबेटर्ससाठी संयुक्त प्रशिक्षण सत्रे सुविधा उपलब्ध करून देईल. ही सत्रे संयुक्त अरब अमिरातीमधील इनक्यूबेटर्सना आदर्श प्रशिक्षण पद्धत विकसित करण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतील आणि पाठबळ मिळालेल्या स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यावर कोणत्या प्रकारची आवश्यकता असेल ते समजून घेतील.
- स्टार्टअपसाठी इनक्यूबेशन्सच्या संधी : संयुक्त अरब अमिरातीमधील स्टार्टअप्सना भारतात भेट देण्यासाठी आणि भारतात इन्क्युबेशन्सच्या संधीचा शोध घेण्यासाठी संयुक्त कार्यक्रम देखील शोधला जाईल. भारतीय स्टार्टअप्स आणि आपल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्षेत्रातील योग्य संबंधितांसोबत कामकरण्यासाठी, भारतीय इनक्यूबेटर्सचे मोठे जाळे आणि त्यांचे कौशल्य संयुक्त अरब अमिरातीतील आधारित स्टार्टअप्सना मोठी संधी प्रदान करेल.
- गुंतवणूक निधी: भारतीय भांडवल उपक्रम आणि खाजगी इक्विटी संस्था यांच्याबरोबर युएइमधील गुंतवणूक संस्था काम करतील यावर भारत - संयुक्त अरब अमिराती पूल लक्ष केंद्रित करेल. संयुक्त अरब अमिरातीमधील गुंतवणूक संस्थांपैकी काही आज आमच्यासोबत आहेत. आम्ही गेल्या काही वर्षांपासून पाहत आहोत की भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम ही युएइ स्थित गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची उत्कृष्ट संधी आहे आणि आम्ही ही गुंतवणूक भागीदारी सुरू ठेवण्यासाठी संयुक्तपणे काम करू.
- मास्टरक्लास: भारत आणि युएइ मधील स्टार्टअप्समध्ये दोन्ही देशांना असलेली संधी मास्टरक्लासची मालिका दर्शवते. निधी उभारणीसाठी समर्थन तसेच स्टार्टअप्स घेण्यासाठी आणि युनिकॉर्नमध्ये बदलण्यासाठी आवश्यक तपशीलांवर भर देते. दोन्ही इकोसिस्टममधील तज्ञांनी घेतलेले हे मास्टरक्लासेस म्हणजे ज्ञानाचे मुख्य भांडार असेल. कोणत्याही स्टार्टअपसाठी हे ज्ञान मार्गदर्शकाचं काम करेल. ज्यांना वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये स्टार्टअप्स वाढवण्याची आणि स्केलिंग करण्याची कला समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन मोलाचे असेल.
- पुढील कार्यक्रम क्षेत्र विशिष्ट समर्थनावर केंद्रित आहेत, भारत आणि युएइमधील स्टार्टअप्सना जागतिक नेते बनण्यास मदत करण्यासाठी दोन्ही क्षेत्रांमधील कॉर्पोरेट्स आणि इकोसिस्टम भागीदारांसोबत जवळून काम करणे.
- हा पूल स्टार्टअप इंडिया पोर्टलवरील 14 वा पूल आहे. प्रत्येक उद्योजक त्यांच्या स्टार्टअपच्या वाढीला चालना देण्यासाठीच नव्हे तर दोन देशातील भागीदारांकडून शिकण्यासाठी मॅन्युअलवर जाईल.
- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत आणि अर्थव्यवस्था मंत्रालय, युएइ यांना हा पूल एकत्र आणतो. हा पूल भारतीय आणि युएइ स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीला परस्पर सहकार्यासाठी दोन्ही देशांच्या निरंतर कार्याचे फलित आहे.
- हा पूल दीर्घकालीन कार्यक्रमांद्वारे दोन्ही देशांमध्ये मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील सहकार्याच्या औपचारिकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा पूल या परस्पर भागीदारीसाठी आमची वचनबद्धता आहे.
JPS/SC/PJ/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825149)
Visitor Counter : 196