वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी कराराचा (CEPA) भाग म्हणून भारत-संयुक्त अरब अमिराती स्टार्ट अप ब्रिजचे मुंबईत उद्घाटन
भारतीय स्टार्ट-अप्सना संयुक्त अरब अमिराती च्या गुंतवणुकीचा लाभ होईल; तर संयुक्त अरब अमिरातीला भारताच्या अनुभवाचा फायदा होईल
"भारत- संयुक्त अरब अमिराती संबंध 21 व्या शतकातील महत्वपूर्ण भागीदारी असेल " - वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
“सीईपीए दोन्ही देशांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ उपलब्ध करून देते - संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल मारी
Posted On:
13 MAY 2022 5:48PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मे 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल-मारी यांनी आज मुंबईत भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) द्वारे आयोजित भारत-संयुक्त अरब अमिराती सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी शिखर परिषदेत 'भारत-युएई स्टार्ट अप ब्रिज' चे उद्घाटन केले.

शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकत्रितपणे काम करण्याची प्रचंड क्षमता आहे आणि सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारामुळे (CEPA) जगभरातील बाजारपेठांची दारे खुली होतील आणि भविष्यासाठी सज्ज , अधिक मजबूत आणि लवचिक द्विपक्षीय भागीदारी उभारण्यास मदत होईल.

गोयल म्हणाले की भारत-यूएई भागीदारीची व्याख्या ‘ओपननेस, अपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ’ या टॅगलाइनद्वारे उत्तम प्रकारे परिभाषित केली आहे आणि नजीकच्या भविष्यात उभय देशांमधील व्यापार किमान 100 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारत-यूएई सीईपीएचा विविध क्षेत्रांना लाभ होणार असून त्याबाबत गोयल म्हणाले की, भागीदारीचे फायदे या वर्षापासूनच मिळू लागतील असा त्यांना विश्वास आहे. रत्ने आणि दागिन्यांच्या क्षेत्राच्या कामगिरीतून याची झलक दिसली आहे असे ते म्हणाले.
औषध निर्मिती क्षेत्राविषयी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले की सीईपीएने भारतीय औषध उत्पादनांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जलद गतीने मंजुरी मिळण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. “जगातील कोणत्याही देशाने प्रथमच भारताला अशा प्रकारचा लाभ दिला आहे,” असे ते पुढे म्हणाले.
गोयल म्हणाले की भारत आणि संयुक्त अरब अमिराती शैक्षणिक भागीदारी आणि दृढ ऊर्जा सहकार्यासाठी उत्सुक आहेत. ग्रीन हायड्रोजन हे असे क्षेत्र असेल , ज्यात दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले.
संयुक्त अरब अमिरातीचे वित्तमंत्री अब्दुल्लाह अल मारी यांनी कराराच्या चौकटीत अंतर्भूत असलेल्या महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. CEPA -सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही राष्ट्रांना आर्थिक लाभ होतील आणि या कराराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यायोगे अनेक संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थव्यवस्थेत 1 पूर्णांक 7दशांश टक्क्यांनी वृद्धी होईल आणि 1 लाख 40 हजार रोजगार निर्माण होतील. संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांनी सांगितलं की, CEPA-सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार अतिशय लवचिक आहे आणि त्यात असे पैलू आहेत की जे डिजिटल अर्हव्यवस्था आणि डिजिटल व्यवहारांच्या भविष्यातल्या चर्चेसाठी अधिक वाव देतात. भारत - संयुक्त अरब अमिरात यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामध्ये सरकारी खरेदी आणि बौद्धिक संपदा हक्क यांना देखील विशेष महत्त्व आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारत-संयुक्त अरब अमिराती स्टार्टअप पूल विषयी :
- भारत-संयुक्त अरब अमिराती स्टार्टअप पूल हा सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सी ई पी ए) चा भाग असून सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानाद्वारे, वेगवर्धक , इनक्यूबेटर आणि इतर अशा इकोसिस्टम हितसंबंधितांमधील मजबूत संबंधांद्वारे सहकार्य अधिक मजबूत करून स्टार्ट अप ना प्रोत्साहन देण्यासाठी लाभदायक आहे.
- भारत आणि यु ए ई दरम्यान चा हा करार एखाद्या पुलाप्रमाणे दोन्ही देशांचे उद्योजक आणि हितसंबंधितांना एकाच छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या एकल मंचाच्या स्वरूपात कार्य करेल. या मंचाद्वारे भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातीमधील स्टार्टअप कार्यक्षेत्राची माहिती उभय देशांतील उद्योजक आणि हितसंबंधितांना सहज उपलब्ध होईल.
- अस्तित्वात असलेल्या 750 हून अधिक इनक्यूबेटर्ससह भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्रामध्ये जागतिकस्तरावर सर्वात बळकट स्टार्टअप समर्थित पायाभूत सुविधा भारतात आहेत. हा पूल भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील इनक्यूबेटर्ससाठी संयुक्त प्रशिक्षणसत्रे सुविधा उपलब्ध करून देईल.
- भारतीय स्टार्ट अप इको सिस्टिम ही यूएई स्थित गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे उत्तम स्थान आहे. भारतीय व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी हाऊसेस यांच्यासोबत काम करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती मधले गुंतवणूकदार आकर्षित करण्यावर हा पूल लक्ष केंद्रित करेल.
- हा पूल स्टार्ट-अप्सना बाजारपेठेत प्रवेश कारण्यासंदर्भातली माहिती देखील प्रदान करेल, तसंच दोन्ही देशांमध्ये व्यवसाय स्थापित करणे आणि जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याचा विस्तार करण्याविषयी मूल्यांकन करेल.
JPS/GC/SK/BS/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825146)
Visitor Counter : 204