संरक्षण मंत्रालय
ग्रुप कॅप्टन सुशांत बिस्वास, व्हीएसएम, यांनी ठाणे येथील भारतीय वायुदलाच्या स्थानकाचा स्वीकारला पदभार
Posted On:
10 MAY 2022 2:25PM by PIB Mumbai
मुंबई, 10 मे 2022
ग्रुप कॅप्टन सुशांत बिस्वास व्हीएसएम यांनी काल 09 मे 2022 रोजी ठाणे येथील हवाई दलाचे स्थानक कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. ठाणे येथे झालेल्या लष्करी समारंभात भारतीय वायुदलाच्या ठाणे केंद्राचा पदभार त्यांनी स्वीकारला. तत्पूर्वी ग्रुप कॅप्टन शेखर शर्मा हे या पदावर कार्यरत होते.
ग्रुप कॅप्टन सुशांत बिस्वास हे कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना एअरक्राफ्ट नेव्हिगेशन आणि मिसाईल सिस्टीमचा दीर्घकालीन अनुभव आहे. त्यांनी हवाई दलाच्या विविध आस्थापनांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत आणि ठाणे हवाई दलाच्या स्थानकाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते कमांड एअर डिफेन्स ऑफिसर (मिसाईल), या अधिकार पदावर दक्षिण पश्चिम हवाई कमांडच्या मुख्यालयावर कार्यरत होते. ते विशिष्ट सेवा पदक (VSM) प्राप्त अधिकारी आहेत.
* * *
PIB Mumbai | S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824129)
Visitor Counter : 187