पर्यटन मंत्रालय
अतुल्य भारत पर्यटक समन्वयक प्रमाणपत्र कार्यक्रम -पर्यटक समन्वयकांच्या पहिल्या तुकडीला ओळखपत्र आणि बिल्ल्यांचे वितरण
Posted On:
06 MAY 2022 5:40PM by PIB Mumbai
मुंबई, 6 मे 2022
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने अतुल्य भारत पर्यटक समन्वयक (IITF) हा एक डिजिटल उपक्रम सुरु केला आहे ज्याचा उद्देश एक ऑनलाइन अध्यापन मंच तयार करणे हा आहे तसेच पर्यटन क्षमता असलेल्या दुर्गम प्रदेशासह देशभरात सुप्रशिक्षित आणि व्यावसायिक पर्यटक समन्वयकांची फळी तयार करणे हे यात अभिप्रेत आहे. उमेदवार हे ऑनलाइन अभ्यासक्रम कोठूनही आणि कधीही आणि त्यांच्या स्वत: च्या क्षमतेनुसार करू शकतात. पर्यटन समन्वयक मूलत: एखाद्या ठिकाणाचे/कार्यक्रमाचे/अनुभवाचे दुभाषी असतात ज्यांना पर्यटन स्थळे आकर्षक बनविण्याचे, स्थळांशी संबंधित इतिहास, गैरसमज, दंतकथा आणि संस्कृतीचे स्पष्टीकरण देण्याचे काम दिले जाते. हा कार्यक्रम 01.01.2020 पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अतुल्य भारत पर्यटक समन्वयकांच्या यशस्वी पहिल्या तुकडीला 5 मे 2022 रोजी मुंबईत ओळखपत्रे आणि बिल्ले देण्यात आले. पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण 302 उमेदवारांनी अतुल्य भारत पर्यटक समन्वयक प्रमाणपत्र (IITFC) चा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
अतुल्य भारत पर्यटक समन्वयक प्रमाणपत्र (IITFC) कार्यक्रम, जो भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट-IITTM द्वारे आयोजित केलेला ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे.

08.04.2022 पासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट (IITTM) द्वारे आयोजित केलेल्या अतुल्य भारत पर्यटक समन्वयक प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी सर्व महिला अर्जदार/उमेदवारांना नावनोंदणी शुल्कामध्ये अभ्यासक्रम शुल्काच्या 50% सवलत दिली जात आहे. मूलभूत अभ्यासक्रमाच्या नावनोंदणीची सवलत केवळ महिला सहभागींसाठी लागू असेल.
For further details: https://iitf.gov.in/
* * *
PIB Mumbai | S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823279)
Visitor Counter : 153