माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सायबर सुरक्षा या विषयावर पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने वेबिनारचे आयोजन


ऑनलाईन सुरक्षेसाठी तरुण पिढीत सायबर आणि अर्थ साक्षरतेवर तज्ञांनी दिला भर

सायबर गुन्ह्यांची तक्रार करा 1930 या क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर

Posted On: 05 MAY 2022 4:45PM by PIB Mumbai

मुंबई/गोवा, 5 मे 2022

 

सायबर जगतात सुरक्षित राहण्यासाठी विशेषतः तरुण पिढीला प्रचंड सायबर आणि आर्थिक साक्षरता गरजेची आहे, असे मत गोव्याचे पोलीस निरीक्षक निधीन वल्सन यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालाच्या वतीने ‘सायबर विश्वात सुरक्षित कसे राहावे’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. समाज माध्यमांवर आपली छायाचित्रे आणि वैयक्तिक माहिती सामायिक करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थिक घोटाळे आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. सायबर सुरक्षा आर्क्टिटेट (व्यवस्थापक), शोभित सक्सेना (भापोसे) देखील या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. इंटरनेटच्या सुरक्षित वापरावर त्यांनी मार्गदर्शन केले.

इंटरनेट वापरताना स्वाधीनता हक्क, विशेष अधिकार हक्क यांचे उल्लंघन अजाणतेपणी होऊ शकते. इन्टरनेटचा वापर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करण्यासाठी करू नये असे वल्सन यावेळी म्हणले.

सायबर क्षेत्रातले तज्ञ रमेश बाबू यांनी आपल्या सादरीकरणात ‘सायबर सुरक्षेचे महत्व, ‘आपले शत्रू ओळखा’ आणि ‘स्वतःचा बचाव करा’ यावर भर दिला. वर्ष 2020 मध्ये सायबर हल्ल्यांमुळे भारताचे 1.25 लाख कोटी (16.3 बिलियन अमेरिकन डॉलर) इतके नुकसान झाले आणि 2025 पर्यंत आणखी 435 बिलियन डॉलरचे नुकसान होईल अस अंदाज आह. सायबर गुन्ह्यांमुळे वर्ष 2025 पर्यंत जगाचे 10.5 ट्रीलीयन डॉलरचे नुकसान होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

बॉटनेट, व्हायरस किंवा इतर गैरहेतूने वापरले जाणारे सॉफ्टवेअर, स्पायवेयर, क्रिप्टोरँनसमवेयर आणि ट्रोजन ही माहिती चोरीची सायबर गुन्हेगारांची मुख्य हत्यारे आहेत.

शोभित सक्सेना पोलीस अधीक्षक (गुन्हे), उत्तर गोवा यांनी रँनसमवेयरपासून सावधान राहण्याविषयी माहिती दिली. अनोळखी इमेलसोबत असलेल्या अटेचमेंट न उघडणे, उत्तम संरक्षण (फायरवॉल), अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर अशी मुलभूत काळजी घेतली तर मोलाची मदत होऊ शकते.

 

स्वतःचा बचाव करा

वैयक्तिक माहिती आणि एकदाच वापरले जाणारे पासवर्ड- ओटीपी  मागणारे सॉफ्टवेअर घेऊ नका. स्पॅम इमेल्स ओळखा. कुठल्याही ऑफर देणाऱ्या लिंक्स अग्रेषित करू नका. तुमचे उपकरण इतरांना हाताळण्याची परवानगी देऊ नका.

https://www.virustotal.com/gui/home/upload तसेच  https://www.virustotal.com/gui/home/url या सारख्या संकेत स्थळांवरून अधिकृतता तपासून घ्या. तसेच सायबर हल्ले रोखण्यासाठी अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरा. अधिकृत ॲप आणि अधिकृत संकेतस्थळ वापरा. अँटी व्हायरस सॉफ्टवेअरची खात्री करून घ्या. सुपर मार्केटमधून खरेदी केल्यास फोन क्रमांक आणि इमेल देण्याची गरज नसते.

 

सायबर घोटाळ्यांची तक्रार कुठे करावी

पिडीत व्यक्तीने सर्वात प्रथम काय करायला हवे, तर 1930 या क्रमांकावर फोन करावा किंवा https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर घोटाळ्याची माहिती द्यावी. सर्व माहिती देऊन प्रथम माहिती अहवाल नोंदवून घेण्याचा आग्रह धरावा.

सायबर फसवणुकीची तक्रार CERT-In ला इमेलद्वारे (incident@cert-in.org.in), टेलिफोन क्रमांक 1800-11-4949 आणि फॅक्स क्रमांक 1800-11-6969 येथे करता येते.

वरिष्ठ नागरिकांसाठी सूचना

  • OTPs कधीच सामायिक करू नका.
  • अनोळखी व्यक्तीला उपकरण वापरायला देऊ नका
  • अनोळखी ब्लू टूथ उपकरणाशी आणि  असुरक्षित वायफायला आपले उपकरण जोडू नका
  • नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या.

 

समाज माध्यमांचा वापर

  • छायाचित्रे आणि वैयक्तिक माहिती देताना नेहमी काळजी घ्या
  • प्रोफाईल लॉक करून ठेवणे ही सुरक्षितता आहे
  • गोपनीय माहिती समाज माध्यमांवर सामायिक करणे टाळा
  • मुलांनी पालकांच्या देखरेखीखाली समाज माध्यमांचा वापर करावा.
  • संवेदनशील माहिती समाज माध्यमांवर सामायिक करू नका

 

डी. व्ही. विनोद कुमार, सहसंचालक, पत्र सूचना कार्यालय, यांनी या वेबिनारचे प्रास्ताविक केले. माध्यम आणि दूरसंवाद अधिकारी श्रीयांका चॅटर्जी यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले.

वेबिनार येथे बघू शकता:

 

* * *

JPS/S.Thakur/RA/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1822962) Visitor Counter : 219


Read this release in: English