संरक्षण मंत्रालय

अग्नि दमन-22 : नागरी-लष्करी संस्थांनी एकत्र येऊन अग्निशमनाचा केला अभ्यास

Posted On: 30 APR 2022 7:46PM by PIB Mumbai

पुणे, 30 एप्रिल 2022

 

उन्हाळा आणि अनेक ठिकाणी असलेल्या उच्च तापमानामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरात, सध्या आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.या पार्श्वभूमीवर, आगीचा सामना करण्यासाठी लोकांची जनजागृती करणे आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच, नागरी आणि लष्करी यांच्यासह सर्व यंत्रणांच्या क्षमता तपासून बघण्यासाठी प्रत्यक्ष अभ्यासाची गरज आहे. हे लक्षात घेऊन, अग्नि दमन-22 हा परस्पर सहकार्याचा अग्निशमन अभ्यास उपक्रम राबवण्यात आला, पुण्यात, आज, लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली देहू मार्गावरील, 29 फील्ड अॅम्युनेशन डेपो परिसरात हा संयुक्त अभ्यास झाला.  

यात एकूण 35 अग्निशमन पथके सहभागी झाली होती. ज्यात, 12 नागरी संस्था, जसे एनडीआरएफ, एसडीआरएफ, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवडचा अग्निशमन विभाग, पीएमआरडीए आकुर्डी , एमआयडीसी तळेगाव, तळेगाव दाभाडे नगर परिषद, चाकण नगरपरिषद, भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन विभाग, टाटा मोटर्स लिमिटेड, महिंद्रा व्हेईकल लिमिटेड आणि बजाज ऑटो यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कवायती आणि आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देणे, याची रंगीत तालिम समन्वयातून करण्यात आली होती.

पुण्यात नागरी आणि सैन्य आस्थापनांकडे उपलब्ध असलेल्या सर्व अग्नीशामक स्रोतांचे एकत्रिकरण करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास अतिशय महत्वाचा होता. अग्नी दमन - 22 सरावाच्या निमित्ताने केंद्र/राज्य सरकारच्या संस्थांना एकत्रित प्रयत्न करून तसेच अग्निशमन क्षेत्रातील मनुष्यबळाला किमान वेळात बाधित क्षेत्रात कमाल मदत पोहचवून मौल्यवान जीव आणि संपत्तीचे रक्षण कसे करावे हे शिकण्याची संधी मिळाली.


* * *

PIB Pune | M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821646) Visitor Counter : 136


Read this release in: English