अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएडीटी, नागपूर येथे 29 एप्रिल रोजी भारतीय महसूल सेवेच्या 74 व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ


भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

Posted On: 28 APR 2022 5:31PM by PIB Mumbai

नागपूर, 28 एप्रिल 2022

 

नागपुर येथे स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी   येथे भारतीय महसूल सेवा –आय.आर.एस. च्या  74 व्या तुकडील अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांच्या  प्रशिक्षणाचा समारोप समारंभ 29 एप्रिल , शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता होणार असून याप्रसंगी  भारताचे  उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  राहणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी  म्हणून उपस्थित राहतील तर  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. महापात्रा हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर ही  केंद्र  सरकारच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी असलेली सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा  द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची  निवड केली जाते. थेट  निवड झालेले हे  अधिकारी  प्रत्यक्ष कामावर रुजु होण्यापुर्वी  सुमारे 16 महिन्यांचे  सेवाअंतर्गत प्रशिक्षण घेतात.  या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायद्यांमध्ये तसेच न्यायशास्त्र तसेच सहयोगी कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे याबाबत विशेष माहिती प्रदान केली जाते.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना खाती आणि लेखा प्रणालीचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.  याशिवाय प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि  आर्थिक गैरव्यवहार कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये देखील प्रशिक्षण  दिले जातात. प्रशिक्षणार्थी विशेषकरून करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील असतात ज्याने करभरणा सुलभ होतो.  प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध घटनात्मक/वैधानिक संस्थांशी संलग्नता समाविष्ट आहे. यामध्ये रिजर्व बँक ऑफ इंडीया. सेबी ,एनएसडीएल यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय संघटनासोबत सुद्धा प्रशिक्षणार्थी  तेथील कर अधिकारक्षेत्रांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी अवगत होतात  .

अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये यांनी  सुसज्जीत केले जाते.  16 महिन्याचे  प्रशिक्षण  यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अधिकारी प्रशिक्षणार्थींना देशभरातील आयकर कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त  केले जाते. हे अधिकारी    महसूल संकलनाचे संचालन आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाचा  भूमिका बजावतात.

 

* * *

PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820984) अभ्यागत कक्ष : 204
Read this releasein: English