माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पुणे पुस्तक जत्रेला प्रारंभ; केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागासहीत नामांकित प्रकाशन संस्थेची दालने
पुस्तके खरेदीवर 10 ट्क्क्यांपासून सवलत; येत्या 1 मे 2022 पर्यंत प्रदर्शन खुले राहणार
Posted On:
28 APR 2022 4:45PM by PIB Mumbai
पुणे, 28 एप्रिल 2022
19 व्या पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रेला आज पुण्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पुणेकर रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या क्रीऐटी सिटीमध्ये भरलेल्या यंदाच्या या बुक फेअर चे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक अशोक कामत यांच्या हस्ते झाले.

पुणे बुक फेअर ही भविष्यात व्यापक चळवळ व्हावी आणि जीवन मुल्यांच दर्शन त्यातून घडावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यंदाच्या या प्रदर्शनात 40 हून अधिक दालने असून त्यात देशभरातील नामांकित प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग, जनगणना संचालनालय त्याचबरोबर आकाशवाणी आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यासारख्या सरकारी विभागांची दालने या प्रदर्शनात आहेत.

केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या दालनात 250 हून अधिक विविध विषयांवरील किमान 10 हजार पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान, आरोग्य आणि क्रीडा तसेच गांधी साहित्य बालसाहित्य. मान्यवरांची चरित्र त्याचबरोबर नेत्यांची गाजलेली भाषणे याबद्दलचे विपुल साहित्य या दालनात उपलब्ध असून त्यावर 10 टक्यान पासून 90 टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे.

जनगणना संचालनालयाच्या दालनात 1872 पासून 2011 पर्यंतच्या जन गणने विषयीची काही प्रकाशने पुस्तक आणि सी डी चा स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यावर 20 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे. शिवाय या दालनाला भेट देणाऱ्या साठी विशेष स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं असून प्रोत्साहन पर बक्षिसेही दिली जाणार आहेत. येत्या 1 मे पर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुल राहणार आहे .
* * *
PIB Pune | M.Iyengar/Somani/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820954)
Visitor Counter : 196