सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दिव्य कला शक्ती: दिव्यांग युवक आपल्या कलागुणांचे मुंबईत सादरीकरण करणार


सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांगांसाठी प्रथमच पश्चिम प्रादेशिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 26 APR 2022 7:41PM by PIB Mumbai

मुंबई, 26 एप्रिल 2022

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने मुंबईतल्या वरळी इथल्या नेहरू केंद्र सभागृहामध्ये उद्या, दि. 27 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 'दिव्य कला शक्ती: विटनेसिंग द अॅबिलिटीज इन डिसॅबिलिटीज’ या पहिल्या पश्चिम प्रादेशिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देशभरामध्ये साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले  जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय  सामजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उदघाटन करतील.

कला, संगीत, नृत्य, अॅक्रोबॅटिक्स अशा विविध क्षेत्रामध्ये  दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापक आणि वैशिष्ठ्यपूर्ण व्यासपीठ दिव्य कला शक्ती या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे  पुरवले  जाते. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगजन आपल्यामधील वैशिष्ठयपूर्ण प्रतिभेचे दर्शन घडवतील. दीड तासांपेक्षा अधिक  काळ हा कार्यक्रम होईल असे अपेक्षित असून त्यामध्ये पहिल्यांदाच योग आणि अॅक्रोबॅटिक्सचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दमण आणि दीव या पश्चिम विभागातल्या राज्यांमधून जवळपास 150 पेक्षा जास्त दिव्यांग मुले आणि युवक या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये लोककला, कठपुतळी आणि शास्त्रीय  नृत्य, संगीत यावर आधारित कला सादर करण्यात येणार आहे. प्रादेशिक स्तरावरील स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने गेल्या चार वर्षात राष्ट्रीय स्तरावर आणि देशाच्या इतर क्षेत्रांमध्येही अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 


* * *

PIB Mumbai | S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820266) Visitor Counter : 160


Read this release in: English