संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करातर्फे पुण्यात "फन रन" चे आयोजन

प्रविष्टि तिथि: 26 APR 2022 6:46PM by PIB Mumbai

पुणे, 26 एप्रिल 2022

स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षांचे स्मरण करण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 26 एप्रिल 2022 रोजी मिल्खा सिंग क्रीडा संकुलात (MSSC) लष्करी अधिकारी आणि जवानांच्या पत्नींसाठी "फन रन" चे आयोजन केले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय लष्कराची दक्षिण कमांड सक्रियपणे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. त्याच हेतूने मिल्खा सिंग क्रीडा संकुलात “फन रन” ही  दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लष्करी आधीकारी आणि जवानांच्या पत्नींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व वयोगटातील सहभाग म्हणजे या आधुनिक व्यस्त जगात महिलांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत जागरुकतेचा पुरावा होता. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (AWWA) च्या प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला.श्रीमती नैन आणि इतर ज्येष्ठ महिलांनीही या दौड मध्ये उत्साहाने भाग घेतला. श्रीमती अन्नू कुमारी यांनी या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

* * *

PIB Pune | M.Iyengar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1820237) आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English