संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र विभागातर्फे मुंबई येथे वार्षिक परिषदेचे आयोजन
Posted On:
19 APR 2022 7:48PM by PIB Mumbai
मुंबई 19 एप्रिल 2022
मुंबईत राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाच्या मुख्यालयात आणि मंत्रालयात आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद पार पडली.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र विभागासमोर उभ्या राहणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण समस्यांबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध पायाभूत प्रकल्पांसह राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या परिचालनावर सकारात्मक परिणाम घडविणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

महाराष्ट्र संचालनालयातील अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी देखील नव्या वर्षात घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची लक्ष्ये तसेच उद्दिष्टे जाहीर केली आणि 2021-22 या प्रशिक्षण वर्षात उत्तम कामगिरी करणारे ग्रुप कमांडर्स, कमांडिंग ऑफिसर्स, कर्मचारीवर्ग आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या जवानांचे अभिनंदन केले. देशातील युवकांचे भविष्य घडविण्यात आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात राष्ट्रीय छात्र सेना अत्यंत स्तुत्य कार्य करत आहे याचा देखील त्यांनी उल्लेख्न केला.

क्रीडाराज्यमंत्री अदिती तटकरे, अर्थ विभागाचे मुख्य सचिव ओम प्रकाश आणि शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागाचे मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी देखील या परिषदेला उपस्थित होते.
कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांनंतर ही परिषद घेण्यात आली.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818147)
अभ्यागत कक्ष : 194