दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
“स्मारके आणि वारसा स्थळ संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय दिना’निमित्त पणजी टपाल विभागाकडून “गोव्यातील स्थापत्यशास्त्र समृद्ध वास्तू’ या विष्यावरच्या चित्रमय पोस्ट कार्ड्स आणि आणि विशेष कॅन्सलेशन्सचे प्रकाशन
Posted On:
18 APR 2022 9:21PM by PIB Mumbai
पणजी/ गोवा, 18 एप्रिल 2022
“स्मारके आणि वारसा स्थळ संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय दिना’ निमित्त 18 एप्रिल 2022 रोजी भारतीय टपाल विभागाने “गोव्यातील स्थापत्यशास्त्र समृद्ध वास्तू’ या विष्यावरच्या चित्रमय पोस्टकार्डस आणि आणि विशेष कॅन्सलेशन्सचे प्रकाशन केले. हे प्रकाशन वीणा श्रीनिवास, मुख्य टपाल महासंचालक, महाराष्ट्र विभाग, मुंबई आणि स्वाती पांडेय, टपाल महासंचालक, गोवा विभाग, पणजी, तसेच नार्सिम्हा सामी, वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ बर्नार्ड रॉड्रिग्ज, अध्यक्ष, टपाल तिकीट संग्राहक तसेच नाणी व पदके अभ्यासक संस्था, गोवा उपस्थित होते. संस्थेचे सदस्य तसेच टपाल विभागाचे इतर अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे पणजी येतील टपाल भवनाच्या सभागृहातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

“स्मारके आणि वारसा स्थळ संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय दिना’निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष कॅन्सलेशन्सच्या संरचनेत खास परंपरागत पोर्तुगीज धाटणीच्या खिडक्या दाखविण्यात आल्या आहेत. पोस्टकार्ड्सच्या संचात 4 पोस्टकार्ड्स आहेत ज्यात 1. मडगाव नगरपालिका इमारत, 2. पणजी जुने सचिवालय (आदिलशाही राजवाडा), 3. फर्नांडिस वारसा घर आणि 4. ब्रागांझा मॅनशन यांचा समावेश आहे. चित्रमय पोस्टकार्ड्सचा हा संच पणजी मुख्य टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत 90 रुपये प्रती संच आहे.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817894)
Visitor Counter : 175