वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या सेवा निर्यात क्षेत्राने एप्रिल – मार्च 2021 – 22 मध्ये पहिल्यांदाच गाठले 250 अब्ज डॉलरचे लक्ष्य, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नोंदविली 21.31 टक्के वाढ
भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा) एप्रिल – मार्च 2020-21 दरम्यान 669.65 अब्ज डॉलरच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 34.50 टक्के वाढ
“कोविड-19 जागतिक महामारीमुळे पर्यटन, विमान वाहतूक आणि आदरातिथ्य व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला असूनही सेवा क्षेत्राने आजवरचा उच्चांकी स्तर गाठला” : पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
13 APR 2022 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022
भारताच्या सेवा निर्यात क्षेत्राने पहिल्यांदाच एप्रिल-मार्च 2021-22 या काळात लक्ष्यीत 250 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. या क्षेत्राने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 21.31 टक्के वाढ नोंदविली आहे. मार्च 2022 या महिन्यात सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 22.52 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. ही मार्च 2021 च्या तुलनेत 8.31 टक्क्यांची सकारात्मक वाढ आहे.
एप्रिल- मार्च 2021-22 या काळात भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा) 669.65 अमेरिकन डॉलरच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोचली आहे. मागच्या वर्षी याच काळाच्या तुलनेत ही 34.50 टक्के वाढ आहे. मागच्या महिन्यात, म्हणजेच मार्च 2022 मध्ये भारताच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 15.51 टक्के वाढ होऊन ती 64.75 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोचली.
नवी दिल्लीत आज पत्रकार परिषदेत बोलतांना , वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, कोविड-19 महामारीमुळे आणि युरोपमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मंदी आली असूनही भारताने उच्च निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे.
“कोविड-19 जागतिक महामारीमुळे पर्यटन, विमान वाहतूक आणि आदरातिथ्य व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला असूनही सेवा क्षेत्राने आजवरचा उच्चांकी स्तर गाठला,” ते म्हणाले. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताने आपले एकूण निर्यातीचे 650 अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य गाठले आहे. यामुळेच आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेला निर्यात केंद्रित बनवू शकलो. पंतप्रधानांनी स्वतः परदेशातील भारताच्या 180 दूतावासांच्या बैठका घेतल्या,” असेही गोयल यांनी सांगितले.
*Link for quick Estimates
S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816609)
आगंतुक पटल : 296