PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 13 APR 2022 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 13 एप्रिल 2022

  • 186.07 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 10,870
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.76%
  • 1,081 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,25,05,410
  • 1,088 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.25%)
  • Weekly Positivity Rate (0.24%)
  • 79.49 cr Total Tests conducted so far; 4,29,323 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.07 (1,86,07,06,499) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,25,81,738 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.32 (2,32,25,381) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 45,289 जणांना प्रीकॉशन मात्रा देण्‍यात आली.

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 10,870 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.गेल्या 24 तासांत 1,081 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,05,410 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1088 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,29,323  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.49 (79,49,54,525) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.24% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.25% आहे.

इतर अपडेट्स :

 

 

S.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816531) अभ्यागत कक्ष : 173