अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

हंगेरी येथे गणित ऑलिंपियाडमध्ये चार भारतीय विद्यार्थिनींना कांस्य पदक

प्रविष्टि तिथि: 11 APR 2022 8:21PM by PIB Mumbai

 

मुंबई, दि. 11 एप्रिल, 2022

हंगेरीमध्ये एगर येथे 6 ते 12 एप्रिल, 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 11व्या युरोपियन मुलींच्या गणित ऑलिंपियाड स्पर्धेत चार भारतीय विद्यार्थिनींनी कांस्य पदक जिंकले आहे.

विजेत्या मुलींमध्ये अनन्या राजस रानडे, पुणे; अनुष्का अग्रवाल, दिल्ली; आणि सानिका अमोल बोराडे, नाशिक या इयत्ता बारावीच्या मुली असून गुंजन अग्रवाल, दिल्ली ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे.

या विद्यार्थिंनीबरोबर त्यांचे मार्गदर्शकही उपस्थित होते. यामध्ये

1. डॉ. अदिती सुनील फडके, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.

2. पुलकित सिन्हा, आयआयएससी, बंगलुरू.

3. रोहिणी जोशी, आयआयटी, मुंबई.

ईजीएमओ 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्य पदक विजेत्या विद्यार्थिनींपैकी अनुष्का आणि गुंजन या दोघी भगिनी आहेत. अनन्या आणि अनुष्का या दोघींचेही रौप्य पदक अगदी एका गुणाने हुकले. महामारीमुळे दोन वर्षे ऑलिंपियाड स्पर्धा होवू शकली नाही, त्यामुळे यंदा भारताने पूर्ण ताकदीने आणि तयारीने या स्पर्धेत आपले स्पर्धक उतरवले होते.

गणित ऑलिंपियाड या स्पर्धेमध्ये भारताने 2015 पासून केलेल्या कामगिरीविषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्या नोंदीसाठी या लिंकवर क्लिक करावे:- https://www.egmo.org/countries/country35/

या स्पर्धेविषयी, गणितांविषयी आपल्यासमोर काही समस्या आणि त्यांचे अधिकृत उत्तरे जाणून घेण्यासाठी लिंक:-: https://www.egmo.org/egmos/egmo11/solutions.pdf

गणित ऑलिंपियाडमध्ये विजयी झालेला मुलींचा संघ बुधवार, दि. 13 एप्रिल रोजी पहाटे मुंबईला येत आहे. विजेते आणि त्यांचे मार्गदर्शक नेत्यांचा 13 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.

कृपया यजमान देशाच्या संकेतस्थळाला भेट द्या:- https://egmo2022.hu/

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (एचबीसीएसई)हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), मुंबईचे राष्ट्रीय केंद्र आहे. प्राथमिक शाळेपासून ते पदवीपूर्व महाविद्यालयीन स्तरापर्यंत विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणामध्ये समानता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि देशातल्या वैज्ञानिक साक्षरतेच्या वाढीला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे व्यापक उद्दिष्ट आहे.

एचबीसीएसई विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या शिक्षणातील संशोधन आणि विकासासाठी देशातली प्रमुख संस्था आहे. ही संस्था गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र आणि ऑलिंपियाडच्या कनिष्ठ गटाच्या कार्यक्रमांसाठी भारताचे नोडल केंद्र आहे.

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1815769) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English