नौवहन मंत्रालय
सागरमाला प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी जेएनपीएने घेतली संबधितांची बैठक
Posted On:
07 APR 2022 10:11PM by PIB Mumbai
मुंबई, 7 एप्रिल 2022
भारताचे महत्वपूर्ण मालवाहू बंदर असलेले जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) संबधितांची बैठक बोलावली होती. भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने 2015 मध्ये सुरू केलेल्या सागरमाला उपक्रमाला प्रमुख उपक्रमाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी (भा.प्र.से.) होते. सागरमालाच्या धर्तीवरील जेएनपीएच्या इतर उपक्रमांची माहिती त्यांनी या बैठकीत दिली. यावेळी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, आणि अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. सर्व संबधितांचे आभार मानताना जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीएच्या यशात सर्व संबधितांच्या महत्वाच्या भूमिका आहेत असे सांगितले. “ विविध प्रकल्पांबद्द्ल संबधितांची मते आम्हाला मौल्यवान वाटताच. सुलभ व्यापारसंधींची हमी देत देशाच्या विकासात सातत्यपूर्ण आणि सक्रिय सहकार्य दिल्याबद्दल सर्व संबधितांचे मी आभार मानतो”, असे ते म्हणाले.

“जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण देशातील महत्वाच्या विशेषतः बंदरे आणि सागरी क्षेत्र यामधील प्रमुख गुंतवणूकीपैकी एक आहे. या बंदराची प्रगतीगाथाच बंदराच्या कार्यक्षमतेची आणि आंतराष्ट्रीय स्तराचा व्यापार हाताळण्याच्या क्षमतेची ग्वाही देते”, असे त्यांनी पुढे नमूद केले.
या परिषदेत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने विडीयो आणि ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून सागरमाला उपक्रमांतर्गत आपल्या अखत्यारीत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांबद्दल संबधितांना माहिती दिली.
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814630)
Visitor Counter : 222