विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अवयव आणि उती दान याविषयी गोव्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषद – सीसीएआरआय ने केले विशेष व्याख्यानाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 07 APR 2022 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022

भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था (ICAR –CCARI), गोवा आणि भारतीय कृषी संशोधन परिषद - कृषी विज्ञान केंद्र, उत्तर गोवा यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत गोव्याच्या राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या (SOTTO) सहकार्याने अवयव आणि ऊतींचे दान- जागरूकता/शिक्षण/ माहिती दरी मिटवणे" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.

गोव्याच्या आयसीएआर-सीसीएआरआय चे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात वक्त्यांचे स्वागत केले आणि त्यांचे अनुभव आणि अंध विद्यार्थ्यांशी असलेले ऋणानुबंध विशद केले. स्वत: प्रतिज्ञा केलेले अवयवदाता असल्याने, ते म्हणाले की, अवयव दान करण्याचा निर्णय हा जीवनरक्षक असून , प्रत्यारोपणाची नितांत गरज असलेल्या लोकांना मदत करणारा आहे. त्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या उदात्त हेतूसाठी अवयव दान करण्याची विनंती केली.

गोव्याच्या राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या (SOTTO) सहसंचालक, डॉ. प्रीती वर्गीस यांनी अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व विशेषत: किडनी, हृदय, फुफ्फुस आणि यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या प्रत्यारोपणाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, दरवर्षी सुमारे 5 लाख भारतीयांना अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे प्राणास मुकावे लागते, त्यामुळे अवयवदान हे एक सन्माननीय कार्य आहे आणि प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी आपले अवयव आणि ऊतींचे दान करण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या की, एका व्यक्तीची  अवयवदानाची इच्छा आठ जणांना जीवनदान आणि आठ कुटुंबाचे जीवन बदलणारा प्रकाशकिरण ठरू शकतो. गोव्याच्या राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था, आयईसीच्या सल्लागार श्रद्धा केळकर, यांनी अवयव दानासाठी नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट केली. या कार्यक्रमाला संस्थेचे सुमारे 40 कर्मचारी उपस्थित होते. उत्तर गोव्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषद - कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक मुख्य तांत्रिक अधिकारी, राहुल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1814558) आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English