माहिती आणि प्रसारण मंत्रालय

1 गोवा एनसीसी बटालियन आणि फिल्ड आऊटरीच ब्युरो, गोवा यांच्याकडून मिरामार सागरी किनाऱ्यावर संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम


गोव्यात ‘पुनीत सागर’ मोहिमेला चांगले यश

Posted On: 05 APR 2022 5:44PM by PIB Mumbai

पणजी, 5 एप्रिल 2022

 

1 गोवा एनसीसी बटालियन आणि फिल्ड आऊटरीच ब्युरो, गोवा यांच्याकडून आज मिरामार सागरी किनाऱ्यावर संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. देशभर सुरु असलेल्या ‘पुनीत सागर अभियान’ अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत 100 पेक्षा अधिक मुले आणि मुली सहभागी झाल्या होत्या. एनसीसी कॅडेटसनी अभियानातंर्गत राज्यातील वेताळबाटी, काणकोण, मिरामार किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम आणि जनजागृती मोहीम राबवली. प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आणि प्लास्टीकपासून नैसर्गिक स्रोतांना कसा धोका पोहचतो, हे कॅडेटसनी लघुनाट्यातून सादर केले.

  

मिरामार किनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या मोहिमेत एनसीसी कॅडेटसनी 200 किलोपेक्षा अधिक प्लास्टीक कचरा संकलित केला.

   

राज्यात ‘पुनीत सागर अभियान’ मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. आज राष्ट्रीय सागरी दिनाला जोडून स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. प्लास्टीक आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून सागरी किनार, नदी पात्रे आणि तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी एनसीसीने ही मोहीम हाती घेतली. पुनीत सागर मोहिमेचा उद्देश स्थानिकांमध्ये स्वच्छ भारत संकल्पना स्वच्छ समुद्रकिनारे/किनारे यांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.

 

* * *

PIB Goa | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813784) Visitor Counter : 136


Read this release in: English