महिला आणि बालविकास मंत्रालय
सकस आहाराच्या सवयी लावण्याचे पोषण अभियान मोहिमेचे आवाहन
फिल्ड आऊटरीच ब्युरो यांच्याकडून पाच दिवसांची मोहीम
आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी कलाकारांचे गोव्यात कार्यक्रम
Posted On:
04 APR 2022 3:55PM by PIB Mumbai
गोवा, 4 एप्रिल 2022
आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयी लावून घेत सरकारला आरोग्यसंपन्न भारत निर्माणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करून गोवा फिल्ड आऊटरिच ब्युरोने त्यांच्या पाच दिवसांच्या पोषण अभियान मोहिमेची सोमवारी सांगता केली.
देशभरात विविध ठिकाणी 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत साजरा होत असलेल्या पोषण पंधरवडा या उपक्रमाचा भाग म्हणून केल्या जात असलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणजे ही मोहीम होती. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मिशन पोषण 2 या सर्वसमावेशक पोषण सहाय्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पोषण पंधरवडा पाळला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञान, लक्ष्यवेधी मार्ग आणि अभिसरण या सर्व प्रकारे बालके लहान मुले गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता या सगळ्यांच्या आहारातील पोषण तत्वांबद्दल जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
गोव्यात 31 मार्चला फिल्ड आऊटरिच ब्युरोने पाच दिवसांची मोहीम आखली होती. राम मॅजिक ड्रामा ग्रुपच्या कलाकारांनी म्हापसा, वेळे, पर्वरी आणि जुन्या गोव्यात जनजागृती करणारे कार्यक्रम केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयींचा संदेश त्यांनी शेकडो लोकांपर्यंत पोहोचवला.
फील्ड आऊट रिच ब्युरो हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभाग आहे. ग्रामीण तसेच शहरी लोकांना सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यामार्फत माहिती देऊन विकासाच्या कामात त्यांना सामील करून घेणे हा या विभागाचा हेतू आहे. संपर्काची विविध माध्यमे म्हणजेच छापील माध्यम, दृक श्राव्य , जाहिरात मोहीम, प्रदर्शने, विविध मोहीमा आणि नवीन माध्यमे यांच्या सहाय्याने फिल्ड आऊटरीच ब्युरो हे काम पार पाडते.
* * *
PIB Goa | S.Thakur/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813197)
Visitor Counter : 235