कृषी मंत्रालय
गोव्यात भारतीय कृषी संशोधन परिषद-सीसीएआरआयचा 33 वा वर्धापनदिन साजरा
प्रविष्टि तिथि:
01 APR 2022 5:09PM by PIB Mumbai
गोवा, 1 एप्रिल 2022
भारतीय कृषी संशोधन संस्था-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर-सीसीआरए) चा आज 33 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. संचालक परवीन कुमार, पशुसंवर्धन खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा, वनसंरक्षक डॉ दिनेश कन्नन यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

आयसीएआर-सीसीएआरआयच्या कामगिरीबद्दल अरुण कुमार मिश्रा यांनी संस्थेचे अभिनंदन केले. देशाच्या विकासात कृषी, मत्स्योत्पादन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रातील कामगिरीमुळे 2019 पासून सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे संचालक परवीन कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गोव्यात लवकरच बटाटे आणि फुलकोबी यांची लागवड करणे शक्य होणार आहे. संस्थेने प्रायोगिक तत्वावर याची लागवड केली आहे.
संस्थेच्या यशाबद्दल बोलताना परवीन कुमार यांनी सांगितले की, संस्थेने तांदूळ, काजू, वांगे, चवळी, तांबडी भाजी आणि भेंडी यांची 17 वाणं विकसित केली आहेत.
संस्थेला डुकरांच्या प्रजातीसाठी वीर्य संवर्धकाबद्दल (NBSE) पेटंट मिळाले आहे. आयसीएआरने भात आणि भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोग नियंत्रणासाठी 4 स्तरीय जैव-सूत्रीकरण देखील विकसित केले आहे. कमी खर्चातील बायपास फॅट उत्पादन तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे दुग्धोत्पादनात 20% वाढ झाली आहे.
आयसीएआरने पुढाकार घेतल्यामुळे गोवा काजू फेनी (2009), खोल मिरची, मांडोली केळी (2019) यांच्यासाठी भौगोलिक सूचकांक (जीआय इंडेक्स) मिळाला आहे. तर, गोवन पोर्क सॉससाठी जीआयची प्रक्रिया सुरु आहे.

माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभाविरित्या वापर करुन संस्थेने डिसीजन सपोर्ट सिस्टीम (DSS)- 26 लाख दर्शक, खतांच्या योग्य मापनासाठी ऍप-(78,000 वापरकर्ते) विकसित केले आहे. मासे शोधण्यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा आणि जास्तीत जास्त मासेमारी व्हावी यासाठी संभाव्य मासेमारी क्षेत्र निवडले आहे. यामुळे शोध कालावधी 50% नी कमी झाला आहे तर मासेमारी 120% नी वाढली आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती पाठवली जाते.

संस्थेने 2019 पासून आठवड्यातून दोन दिवस हवामान अंदाज आणि त्यानूसार सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होऊन सुमारे 9 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे.
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संशोधनात मोलाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1812369)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English