संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएचएस अश्विनी इथे बॉम्बे मेडिकल काँग्रेसची 76वी वार्षिक परिषद संपन्न

Posted On: 29 MAR 2022 6:40PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मार्च 2022

 

बॉम्बे मेडिकल काँग्रेसची 76 वी वार्षिक परिषद गेल्या आठवड्यात (26 आणि 27 मार्च 2022 रोजी) आयएनएचएस  अश्विनी, मुंबई येथे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.

परिषदेची सुरुवात एका छोटेखानी उद्घाटन सोहळ्याने झाली. यावेळी व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ नौदल पश्चिम विभाग( वेस्टर्न नेव्हल कमांड), सर्जन व्हाईस ऍडमिरल  रजत दत्ता, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, पीएचएस,  सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालकआणि इतर वरिष्ठ सेवा अधिकारी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांनी भाषणे दिली. व्हाईस ऍडमिरल  के. स्वामीनाथन, एव्हीएसएम, व्हीएसएम, चीफ ऑफ स्टाफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांच्या अध्यक्षतेखालील एका सत्रात " आरोग्यसेवेची नव्याने कल्पनामांडणी: काय भविष्य आधीच इथे आहे?" या विषयावर सर्जन व्हाईस ऍडमिरल  नवीन चावला, एव्हीएसएम, व्हीएसएम, पीएचएस, नौदलाच्या वैद्यकीय सेवेचे महासंचालक यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे  भाषण दिले.

कॅमेरॉन पिंटो व्याख्यानमालेत डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे "आपण आणखी एका महीमारीसाठी चांगल्यारीतीने तयार आहोत का?" आणि  चेतन भगत यांचे मेंडा-साळसकर व्याख्यानमालेतील “शब्दांद्वारे उपचार” ही व्याख्याने या परिषदेतील इतर काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.  याव्यतिरिक्त, डॉ. जरीर उडवाडिया आणि डॉ. प्रिया अब्राहम यांसारख्या प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिकांनीही व्याख्याने दिली.

या परिषदेत 'जर्नल ऑफ द मरीन मेडिकल सोसायटी' च्या 24 व्या आवृत्तीचे प्रकाशन, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कागदरहीत आणि ई-पोस्टर स्पर्धा, समकालीन वैद्यकीय समस्यांवरील वादविवाद आणि आंतरमहाविद्यालयीन अंडरग्रॅज्युएट परिसंवाददेखील झाले.

सशस्त्र दलातील अनेक डॉक्टर्स आणि वरिष्ठ प्राध्यापक सदस्य, रहिवासी, इंटर्न आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नागरी मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811058) Visitor Counter : 221


Read this release in: English