नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ओल्ड गोवा येथे खासदारनिधीतून रस्त्याचे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2022 8:21PM by PIB Mumbai

गोवा, 28 मार्च 2022

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ओल्ड गोवा येथे खासदारनिधीतून बांधलेल्या सनशाईन वर्ल्डवाईड शाळा ते नाणीजमठ रस्त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. रस्त्यासमवेत नाली आणि संरक्षणभिंतीचे काम खासदारनिधीतून 21 लाख रुपये खर्च करुन करण्यात आले आहे. परिसरातील शाळा आणि नाणीजमठाकडे जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्यामुळे सुविधा झाली आहे.  

शासकीय निधीचा उपयोग हा जनकल्याणासाठी करायचा असतो. त्यामुळे योग्य कामाच्या ठिकाणी निधी गुंतवणे महत्त्वाचे असल्याचे श्रीपाद नाईक याप्रसंगी म्हणाले. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात खासदारनिधीतून उत्तर गोव्यात 1,000 प्रकल्प पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात कोविड महामारीच्या संकटाने याला खिळ बसली होती. मात्र, आता पुन्हा पुर्ववत निधी सुरु झाल्यामुळे राहिलेली कामे लवकरच पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.


* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1810670) आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English