युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
7 दिवसीय निवासी 13 वा राष्ट्रीय आदिवासी युथ एक्सचेंज कार्यक्रमाचा मुंबईत समारोप
सहभागींनी आनंद व्यक्त करत हा एक समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगितले.
Posted On:
27 MAR 2022 8:34PM by PIB Mumbai
7 दिवसीय निवासी “13 व्या राष्ट्रीय आदिवासी युथ एक्सचेंज कार्यक्रमाचा' समारोप सोहळा आज मुंबईत संपन्न झाला. या कार्यक्रमात नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाशकुमार मानुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पश्चिम क्षेत्राचे ओमप्रकाश वाघमारे यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमातील सहभागींनी त्यांचा आनंद व्यक्त केला आणि हा एक समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगितले. बिहारच्या गया येथील पुष्पा कुमारी म्हणाल्या की, मुंबईत आल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
दुसरे एक सहभागी, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील सी राजकुमार रेड्डी म्हणाले की, ‘राजभवन, मुंबई विद्यापीठ यांसारख्या ठिकाणी भेट देणे हा एक भाग्याचा क्षण आहे ;हे माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहेत.
बिहारमधील जमुई, लखीसराय आणि गया जिल्ह्यांमधील आणि तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेममधून 218 आदिवासी युवक युवती हे या एक्सचेंज कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईत आले होते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाठवण्यात आले आहे.
नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), महाराष्ट्र आणि गोवा, केंद्रीय राखीव पोलीस दल, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समन्वयाने 22 ते 28 मार्च 2022 या कालावधीत आठवडाभर चालणारा आदिवासी युथ एक्सचेंज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनात लोकांची सांस्कृतिक मूल्ये ,भाषा आणि जीवनशैली, विविधतेतील एकता समजून घेण्यासाठी निवडक राज्ये आणि जिल्ह्यांतील आदिवासी तरुणांना देशातील विविध ठिकाणी भेट देण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
संबंधित राज्यातील विविध विकास उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे आणि तिथे उपलब्ध शैक्षणिक, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींसह आदिवासी तरुणांना देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
***
Jaydevi S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810291)
Visitor Counter : 227