अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

काही भारतीय आणि परदेशी वाहन उत्पादक कंपन्या हायड्रोजन इंधन सेलवरील वाहने तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत: अवजड उद्योग राज्यमंत्री श्री कृष्ण पाल गुर्जर

प्रविष्टि तिथि: 25 MAR 2022 7:50PM by PIB Mumbai

 

अवजड उद्योग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या वाहनउद्योग आणि वाहनांचे सुटे घटक याअंतर्गत हायड्रोजन फ्युएल सेल वाहने आणि त्यांच्या घटकांच्या उत्पादनांवर 13% ते 18% या श्रेणीत उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (प्राॅडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, PLI) योजना लागू केलेली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) 'सियामकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील काही उत्पादकांनी हायड्रोजन इंधन सेल वाहनांचे प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि भारतातील काही जागतिक उत्पादकांनी इंधन सेल वाहनांचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविलेले आहे.

सियाम(SIAM) कडून मिळालेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी याआधीच हायड्रोजन वाहने विकसित करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले आहेत.  इंडियन ऑइलचे फरीदाबाद येथील आर अँड डी सेंटर, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी, गुरुग्राम येथे प्रत्येकी एक, अशी दोन हायड्रोजन इंधन भरण्याची केंद्रे देखील स्थापन करण्यात आली आहेत.

अवजड उद्योग राज्यमंत्री श्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1809832) आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी