नौवहन मंत्रालय
लोकसभेत बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदान मागणीला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2022 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2022
केंद्रीय बंदरे , नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षांत भारतातील जलमार्गाची अफाट क्षमता खऱ्या अर्थाने साकार झाली आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागणीवरील चर्चेला सोनोवाल उत्तर देत होते. ही मागणी नंतर लोकसभेने मंजूर केली.
ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सागरमाला आणि मेरिटाईम इंडिया व्हिजन 2030 अंतर्गत निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांमुळे भारताच्या निर्यात आणि आयात तसेच देशांतर्गत व्यापारात मोठा फायदा झाला आहे, ज्यापैकी 95% सागरी क्षेत्राद्वारे करण्यात आला आहे. ते म्हणाले की, भारताकडे 7,517 किमी लांबीची किनारपट्टी, 11 प्रमुख बंदरे आणि 200 अन्य बंदरे आहेत जी राज्य सरकारे विकसित करत आहेत. बंदर प्रणित औद्योगिकीकरण, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, मासेमारी बंदर, पर्यटन, किनारी भागात समुदाय विकास या कामांचा सर्व राज्यांना मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
बंदरांची तुलनात्मक वाढ अधोरेखित करत ते म्हणाले की 2014 पर्यंत EoDb मानांकन 134 होते, आता ते 68 आहे. 2014 पर्यंत प्रमुख बंदरांची क्षमता वार्षिक 800.52 मेट्रिक टन होती, आता ती 1560.61 मेट्रिक टन झाली आहे, अन्य बंदरांची क्षमता जी 2014 पर्यंत 689 मेट्रिक टन होती, ती आता 1224 मेट्रिक टन झाली आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1809405)
आगंतुक पटल : 264
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English