अणुऊर्जा विभाग
अणुउर्जा निर्मिती
Posted On:
23 MAR 2022 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2022
विद्यमान शतक संपेपर्यंत (वर्ष 2100) अणुउर्जा निर्मितीचे लक्ष्य अजून निर्धारित केलेले नाही. सद्यस्थितीला असलेली 6780 मेगावॉट अणुउर्जा निर्मिती क्षमता, वर्ष 2031 पर्यंत 22480 मेगावॉट पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
सध्या निर्मिती अवस्थेत असलेल्या 8700 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांखेरीज केंद्र सरकारने फ्लीट प्रकारातील प्रत्येकी 700 मेगावॉट क्षमतेच्या स्वदेशी पीएचडब्ल्यूआर प्रकारच्या 10 प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रशासकीय परवानग्या आणि आर्थिक मंजुरीसाठी मान्यता दिली आहे. सध्या निर्मिती अवस्थेत असलेले तसेच मंजूर झालेले अणुउर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्ष 2031 पर्यंत देशातील एकूण अणुउर्जा निर्मिती 22480 मेगावॉटवर पोहोचेल. यामध्ये भाविनी द्वारे लागू होत असलेल्या 500 मेगावॉट निर्मिती क्षमतेच्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर प्रकल्पाचा समावेश आहे.
आतापर्यंत मंजूर झालेल्या प्रकल्पांशिवाय सरकारने खालील पाच नव्या ठिकाणी अणुउर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ‘तत्वतः’ मंजुरी घेतली आहे:
Site & Location
|
Capacity (MW)
|
In Cooperation With
|
Jaitapur, Maharashtra
|
6 X 1650
|
France
|
Kovvada, Andhra Pradesh
|
6 X 1208
|
United States of
America
|
Chhaya, MithiVirdi, Gujarat
|
6 X 1000*
|
Haripur, West Bengal
|
6 X 1000*
|
Russian Federation
|
Bhimpur, Madhya Pradesh
|
4 X 700
|
Indigenous
|
'*’ किरकोळ क्षमता
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808808)