अर्थ मंत्रालय
आपत्कालीन पतहमी योजने अंतर्गत 95% पेक्षा जास्त एमएसएमई ना लाभ
Posted On:
22 MAR 2022 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2022
आपत्कालीन पत हमी योजना (ECLGS) चालवणारी संस्था, नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड ने सूचित केल्यानुसार, 11.3.2022 पर्यंत, एकूण 117.87 लाख व्यवसायांना आपत्कालीन पत हमी योजनेअंतर्गत 100% तारण मुक्त कर्ज हमीचे पाठबळ देण्यात आले ज्यात सुमारे 95.21% एमएसएमई होते. ही माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पात्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि इतर पात्र व्यावसायिक उपक्रमांना त्यांच्या परिचालन दायित्वांची पूर्तता करण्यासाठी आणि कोविड-19 महामारीमुळे संकटात सापडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ म्हणून आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असलेली आपत्कालीन पत हमी योजना मे 2020 मध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. त्यात अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा समावेश होता. या योजनेअंतर्गत पात्र ऋणकोंना त्यांनी विस्तारित केलेल्या पत सुविधेमार्फत सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांना (MLIs) 100% हमी दिली जाते असेही मंत्र्यांनी सांगितले.
आपत्कालीन पतहमी योजनेला मार्च 2023 मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 वरील त्यांच्या भाषणात केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने सरकारने ही योजना 31.3.2023 पर्यंत एक वर्षाने वाढवली आहे असेही मंत्र्यांनी नमूद केले.
R.Aghor/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808395)
Visitor Counter : 196