संरक्षण मंत्रालय
संरक्षण सामग्री प्रदर्शन व पुरवठादार विकास मालिका
21 मार्च 2022 रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स
Posted On:
21 MAR 2022 8:47PM by PIB Mumbai
पुणे, 21 मार्च 2022
इंडस्ट्री अँन्ड अग्रीकल्चर आयोजित परिसंवादात लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस नैन, PVSM, AVSM, SM यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. या कार्यक्रमाला दक्षिण कमांड मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्कराच्या प्रादेशिक तंत्रज्ञान विभागाचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी परस्परसंवाद साधला यासोबतच या कार्यक्रमात देशांतर्गत उत्पादित झालेल्या वेगवेगळ्या संरक्षण सामग्रीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

उद्योगांचे प्रमुख, सरंक्षण मंत्रालय, डिजीक्युए, तसेच डिआरडीओ सदस्य यांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना लेफ्टनंट जनरल एस नैन यांनी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणावर भर देण्याची तातडीची गरज, विशेषतः सध्याच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित केली.
लष्कराने अगदी कमी कालावधीच्या पूर्वसूचनेवरूनही लष्करी कारवाई हाती घेण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे पारंपारिक युद्ध कौशल्याला नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम कॉम्प्युटिंग , कृत्रिम बुद्धिमत्ता, मानव विरहित आणि यंत्र मानवी उपकरणे यांच्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणेही गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वदेशीकरणामुळे आपल्या देशाच्या संरक्षणाच्या गरजा ओळखून त्या सोडवण्यासाठी मदत होईल आणि शस्त्रास्त्रांचा उत्पादक म्हणून देशाची ओळख निर्माण होईल, यावर त्यांनी भर दिला.
व्यवसाय करण्यासाठीच्या नियमांमध्ये सुलभता आणली आहे त्याच प्रमाणे उद्योगांना सहकार्य म्हणून नवीन नियम करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, त्याचप्रमाणे संशोधन आणि विकास तसेच खरेदी प्रक्रिया यांची जलदगती यासारखी अनेक पावले सरकारकडून उचलली जात आहेत. शिवाय संरक्षण सामुग्री अधिग्रहण प्रक्रियेतील नवीन बदल त्याच प्रमाणे आत्मनिर्भरता या उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्राला मिळणाऱ्या निधीत लक्षणीय वाढ जाहीर झाली आहे यामुळे संरक्षण संबंध येतील खरेदीला प्रोत्साहन मिळेल. संरक्षण क्षेत्रातील उद्योग विविध मार्गांनी लष्कराला हात करू शकतात याबद्दल सांगून त्यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योग तसेच टायर वन आणि टायर टू या स्तरातील पुरवठादारांनी आपली उद्योगक्षमता बळकट करावी असे सांगितले.
M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807920)
Visitor Counter : 166