वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सीप्झ सेझ मध्ये विद्युत सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे लेखा परीक्षण केले जाणार
विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी सीप्झ येथे विद्युत सुरक्षा जागरूकता कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
21 MAR 2022 8:25PM by PIB Mumbai
मुंबई, 21 मार्च 2022
मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) येथे पुढील सहा महिन्यांत विद्युत सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे लेखा परीक्षण केले जाईल. विद्युत सुरक्षेच्या प्राथमिक उद्दिष्टासह, ऊर्जा ऑडिट केवळ सुरक्षितता उपायांचेच मूल्यांकन करणार नाही तर ऊर्जा कार्यक्षम विजेची उपकरणे कमी करण्यासाठी केलेल्या उपायांचे देखील मूल्यांकन करेल. याबाबतची विनंती सीप्झचे विभागीय विकास आयुक्त श्याम जगन्नाथन यांनी सोमवारी केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) यांना सीप्झ सेझ येथे आयोजित विद्युत सुरक्षा जागरूकता कार्यशाळेच्या निमित्ताने केली.

"आम्ही सेझ मधील प्रत्येकाला केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने विहित केलेल्या सुरक्षा प्रमाणीकरणाची पुष्टी करण्याची विनंती करतो," असे जगन्नाथन म्हणाले.
भारतात दररोज वीजेशी संबंधित सरासरी 5-6 जीवघेणे अपघात घडतात. त्या तुलनेने, विकसित देशांमध्ये दरवर्षी 1-2 जीवघेणे अपघात घडतात. म्हणून, सुरक्षा अनुपालन आवश्यक आहे,” असे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे प्रादेशिक निरीक्षक कार्यालय (पश्चिम) चे संचालक एल.के.एस. राठोड म्हणाले.
दुर्घटनांची संख्या आणि त्यामागील कारणे यावर सीईएचे मुख्य अभियंता रमेश कुमार म्हणाले, “एकूण प्राणघातक आणि गैर-प्राणघातक दुर्घटनांची संख्या 40,000 इतकी खूप जास्त आहे, वार्षिक प्राणघातक अपघात सुमारे 2,000. आहेत. यातील बहुतांश घटना कमी व्होल्टेजच्या विजेच्या संपर्कात आल्याने घडतात. सदोष इन्सुलेशन, विद्युत उपकरणांची कमतरता किंवा अयोग्य अर्थिंग, अनधिकृत काम, खराब वायरिंग, कमी आकाराच्या तारा आणि केबल्स, स्विच बोर्डमधील ओलावा आणि कंडक्टरच्या संपर्कात येणे इत्यादी विविध कारणे आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर , हे सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे घडतात.

भारतातील विद्युत अपघातांच्या आकडेवारीनुसार, वर्षानुवर्षे वीजेचा जास्त प्रसार आणि अधिक वापरकर्ते असूनही दुर्घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे. लोकांमध्ये जागरुकता वाढल्यामुळे ही घट दिसून येत आहे.
सीप्झ सेझ मधील कार्यशाळेत तांत्रिक सत्रांचा समावेश होता , ज्यामध्ये सहभागींना विद्युत सुरक्षा संबंधी खबरदारी आणि आवश्यक पद्धतींबद्दल जागरूक करण्यात आले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807884)
अभ्यागत कक्ष : 169