संरक्षण मंत्रालय
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (ईस्टर्न नेव्हल कमांड) यांनी मुंबईतील पश्चिम नौदल कमांडला दिली भेट
Posted On:
16 MAR 2022 8:12PM by PIB Mumbai
मुंबई, 16 मार्च 2022
एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ॲडमिरल श्री.बिस्वजित दासगुप्ता,ईस्टर्न नेव्हल कमांड यांनी 14 ते 16 मार्च 2022 या कालावधीत मुंबईला भेट दिली. आगमनानंतर, दासगुप्ता यांनी नेव्हल डॉकयार्ड (मुंबई)येथील गौरव स्तंभावर जाऊन, पुष्पचक्र अर्पण केले आणि यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांड चे,पीव्हीएसएम, एव्हीएस एम,व्हीएसएम, एडीसी, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ,व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग,यांची भेट घेतली.
पश्चिम आणि पूर्व नौदल कमांड्सच्या जबाबदारीचे एकत्रित क्षेत्र हे भारताच्या भूभागाच्या दहापट आहे. दोन्ही कमांडर-इन-चीफ यांनी भारताची सागरी सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने परिचालनाच्या महत्त्वाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.
S.Patil/S. Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806746)
Visitor Counter : 188