युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑलिम्पिक जलतरणपटू माना पटेल हिने पंतप्रधानांनी सुचवलेला उपक्रम ‘मीट द चॅम्पियन्स’ कार्यक्रमांतर्गत गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद


गोव्यातील 75 शाळांमधील विद्यार्थ्यांना संतुलित आहार आणि शारिरीक तंदुरुस्तीचे महत्त्व दिले पटवून

Posted On: 12 MAR 2022 4:15PM by PIB Mumbai

 

गोवा, 12 मार्च  2022

ऑलिम्पिक खेळाडू माना पटेल हिने आज गोव्यातील डॉ के. बी. हेडगेवार शाळेला भेट दिली आणि राज्यातील 75 शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माना पटेल हिने पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी संतुलित आहार आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी विशद केलेल्या विशेष उपक्रमांतर्गत मीट द चॅम्पियन्सची गोव्यात सुरुवात केली.

संतुलित आहाराचे महत्त्व विशद करताना माना पटेल हिने विद्यार्थ्यांना सांगितले, की आपल्या आहारानुसार आपले शरीर घडते. त्यामुळे आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेटस यांचा समतोल असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जंकफूड टाळून फळे आणि भाजीपाला यांचा आहारात समावेश करावा.

माना पटेलने विद्यार्थ्यांना अभ्यास आणि खेळाचा समतोल साधण्याचा सल्ला दिला. तसेच जे काही क्षेत्र निवडाल त्याची मनापासून तयारी करा, असे ती म्हणाली.

राज्यातल्या 75 शाळांतील 300 विद्यार्थी आज या उपक्रमात सहभागी झाले होते.

माना पटेल ही नुकत्याच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारासाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. 'मीट द चॅम्पियन्स' उपक्रमाचा आरंभ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने डिसेंबर 2021 मध्ये केला. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत बजरंग पुनीया, पॅरालिम्पिक पदकविजेते मरियप्पन थंगवेलू, योगेश कथुनिया यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळांप्रती रुचीनिर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तरित्या या अनोख्याउपक्रमाचे आयोजन केले आहे.  टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताच्या प्रचंड यशानंतर जेंव्हा पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधत, त्यांना 75 शाळांना भेट देण्याची आणि संतुलित आहारआणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगण्याची विनंती केली होती, त्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805338) Visitor Counter : 237
Read this release in: English