ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकांच्या हस्ते मुंबईत संदर्भ परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन
पॅकेज्ड पेयजल परीक्षण सुविधा विभागाचेही उद्घाटन
Posted On:
12 MAR 2022 2:21PM by PIB Mumbai
भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी, (भारतीय प्रशासकीय सेवा) यांनी काल 11 मार्च 2022 रोजी संदर्भ परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. यावेळी शास्त्रज्ञ 'जी' डॉ आर के झा, आणि उपमहासंचालक (प्रयोगशाळा) उपस्थित होते.
संदर्भ परीक्षण प्रयोगशाळेसोबतच, पॅकेज्ड पेयजल चाचणी सुविधा असलेल्या पश्चिम प्रादेशिक कार्यालय प्रयोगशाळेच्या रासायनिक विभागातील नवीन आधुनिक उपकरण प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले.
भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या प्रयोगशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा प्रारंभही केला.
पश्चिम विभागातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये विक्री करणाऱ्या सराफांकडील 22, 18 आणि 14 कॅरेट पिवळ्या सोन्याचे नमुने तपासण्यासाठी संदर्भ परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम प्रादेशिक कार्यालय प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण आणि संदर्भ परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना केल्याने भारतीय मानकांनुसार चाचणी केलेल्या भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणित दर्जेदार वस्तूंची उपलब्धता ग्राहकांना सुनिश्चित होईल.
सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची आणि वस्तूंची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था, सर्वसामान्य गोल्ड हॉलमार्किंग योजना राबवत आहे.
शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी, हॉलमार्क असेलल्या सोन्याच्या वस्तूंची भारतीय मानक ब्युरोच्या संदर्भ परीक्षण प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाते. भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील अंधेरी पूर्व, येथील पश्चिम प्रादेशिक कार्यालय प्रयोगशाळा (डब्ल्यूओआरएल) येथे सोन्याच्या वस्तूंच्या संपूर्ण चाचणीची व्यवस्था असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805319)