सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना - केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड
केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योगांसाठी भरीव तरतूद - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
Posted On:
11 MAR 2022 6:17PM by PIB Mumbai
पुणे, 11 मार्च 2022
देशभरातील सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आखल्या असून त्यांच्या माध्यमातूनच आपला देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ . भागवत कराड यांनी आज पुण्यात व्यक्त केला . मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर ला भेट देऊन चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना डॉ . कराड बोलत होते . उद्योगांशी संबंधित अनेकविध अडचणी यावेळी या पदाधिकाऱ्यांनी डॉ . कराड यांच्यापुढे मांडल्या . त्यात प्रमुख मुद्दा अर्थातच सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांपुढे गेल्या काही वर्षात उभ्या राहिलेल्या समस्यांविषयक होता. त्यावर अधिक विस्तृत माहिती देताना डॉ. कराड यांनी गेल्या अर्थसंकल्पात आणि आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून उद्योजकांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केलं.
बँकांकडून होणाऱ्या कर्ज वाटपाविषयी या उद्योगांच्या अजूनही काही अडचणी असल्यास बँक आणि उद्योगांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन त्या सोडवल्या जातील असं डॉ कराड म्हणाले.
त्यानंतर डॉ. कराड यांनी पुण्यात इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आगामी 25 वर्षाचा कालावधी आणि देशहिताला डोळ्यासमोर ठेऊन भारताला अधिक सामर्थ्यशाली बनवणारा 22-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ . कराड यांनी यावेळी सांगितले.
MI/Somani/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805137)
Visitor Counter : 208