दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबई टपाल विभागाच्या वतीने 17 मार्च रोजी डाक अदालतचे आयोजन
डाक अदालतमध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागातील तक्रारींची दखल
स्पीडपोस्ट, बचतबँक, मनीऑर्डर भरणा न मिळणे याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील
Posted On:
11 MAR 2022 6:01PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च 2022
टपालखात्यासंबधीच्या समस्याची दखल घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून टपाल विभाग, महाराष्ट्र, मुंबई यांनी डाक अदालतचे आयोजन केले आहे. 17 मार्च 2022, गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता दुसरा मजला, जीपीओ इमारत, मुंबई 400001 येथे या 118व्या डाक अदालतचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील टपालसेवेसंबधीच्या सहा आठवड्यांमध्येही न सोडवल्या गेलेल्या तक्रारी आणि समस्या या डाक अदालत मध्ये मांडता येतील. रजिस्टर किंवा इतर टपाल, स्पीडपोस्ट, खिडकीवरील सेवा, बचतबँक आणि मनीऑर्डरचा भरणा यासंबधीच्या तक्रारी या डाक अदालतमध्ये घेतल्या जातील.
मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे केली गेली त्याचे नाव, पद तसेच टपाल, मनीऑर्डर्स, बचत खाती वा बचत प्रमाणपत्रे यांचा तपशील या तक्रारीत सविस्तर नमूद असावा.
ग्राहकांच्या समस्यांची विनाविलंब दखल घेण्याच्या उद्देशाने अश्या प्रकारच्या डाक अदालतचे टपाल खात्याकडून वेळोवेळी आयोजन केले जाते.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805131)
Visitor Counter : 178