संरक्षण मंत्रालय
सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूए तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
Posted On:
08 MAR 2022 8:49PM by PIB Mumbai
पुणे, 8 मार्च 2022
सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूए तर्फे पुण्यात “इंद्रधनुष आसमान की ओर ” या शीर्षकाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. एसजीएस मॉल इथे 5 आणि 6 मार्च 2022 रोजी चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 8 मार्च 2022 रोजी पुण्याच्या कॅम्प परिसरात मैत्री कॉम्प्लेक्स येथे एडब्ल्यूडब्ल्यूए संघटनेच्या 20 हून अधिक नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. याशिवाय, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (SSY),1 डिसेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान जन्मलेल्या मुलींना आधार कार्ड देऊन आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत योग्य प्रारंभिक रक्कम भरून त्यांचे खाते उघडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर्न स्टार एडब्ल्यूडब्ल्यूएच्या सर्व फॉर्मेशनद्वारे अशाच प्रकारे आजचा दिवस साजरा केला जात आहे.

* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804136)