ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उस्मानाबाद येथील समूह स्तरावरील महासंघ नवप्रभा महिला प्रभागसंघाला 'आत्मनिर्भर संघटन' पुरस्कार

Posted On: 08 MAR 2022 8:40PM by PIB Mumbai

मुंबई, 8 मार्च 2022

 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात स्थित आणि दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) द्वारे प्रवर्तित समूह स्तरावरील महासंघ (सीएलएफ) नवप्रभा महिला प्रभाग संघाला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 'आत्मनिर्भर संघटन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम विभागातील 0-5 वर्षे श्रेणीमध्ये समूह स्तरावरील महासंघाला हा पुरस्कार दिल जातो.

नवप्रभा महिला प्रभागसंघ, जेरवली हा नोंदणीकृत सीएलएफ आहे. सीएलएफ ची स्थापना 6 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. त्यात 275 बचत गट आणि 12 ग्रामीण संस्था आहेत. हा सीएलएफ  मासिक EC बैठक आयोजित करतो  आणि बैठकीची नियमितता 95% उपस्थितीसह 100% आहे. समूह स्तरावरील महासंघाकडे रोख शिल्लक मागणी (डिमांड कॅश बॅलन्स) संगणकीकृत आहे त्यामुळे त्यांना मासिक परतफेड दर आणि तारणपत्रांची थकबाकी (PAR) कळते. 

समूह स्तरावरील महासंघ म्हणजेच सीएलएफ, नियमितपणे परतफेडीचा आढावा घेते, कर्मचारी आणि प्रशिक्षित व्यक्तींचा आढावा घेते. ते सदस्यांच्या उपजीविकेच्या कामांचा नियमित आढावा घेतात. गेल्या आर्थिक वर्षात त्यांना 78,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला आणि त्यांची कार्यरत स्वयं शाश्वतता किंवा OSS 157% आहे, ज्यातून हे समजते की सीएलएफ व्याजाच्या कमाईतून त्यांचे कार्यान्वयन खर्च व्यवस्थापित करण्यास सक्षम आहे.

महिलांवरील अत्याचार, बालविवाह आणि तस्करी यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध विषयांवर नवप्रभा काम करते. अन्न, पोषण, आरोग्य आणि वॉश (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) (FNHW) मध्ये, त्यांनी सरकारच्या अस्मिता प्रकल्पासोबत मोठ्या प्रमाणावर काम केले आणि त्यांच्या सदस्यांना आणि किशोरवयीन मुलींना अनुदानित सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. लैंगिक आणि सामाजिक समावेशात, त्यांनी 212 महत्वाच्या व्यक्ती शोधून 8 पंचायतींमध्ये त्या महत्वाच्या व्यक्तींचा मंच चालवला आहे आणि 35 किशोर गट तयार केले आहेत.

उदरनिर्वाहात ते मनरेगा सारख्या सरकारी कार्यक्रमांसोबत एकत्र आले आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने महिलांसाठी मालमत्ता निर्माण केली. पंचायत राज संस्था -समुदाय आधारित संघटन अभिसरणामध्ये सीएलएफ सदस्यांनी 200 पेक्षा जास्त राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमात (NSAP) प्रवेश केला आणि 300 पेक्षा जास्त सदस्यांनी उज्ज्वला योजनेत प्रवेश केला. सीएलएफने त्यांच्या सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये भाग घेण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली.

दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सीएलएफ च्या अनुकरणीय कामगिरीची दखल म्हणून 'आत्मनिर्भर संघटन' ने गौरव केला. 


* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804126) Visitor Counter : 226


Read this release in: English