माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजनतर्फे महिला केंद्रित माहितीपटांचा चित्रपट महोत्सव
यानिमित्त इतर उपक्रमांबरोबरच आरोग्य तपासणी शिबिर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2022 7:39PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मार्च 2022
ऑनलाइन चित्रपट महोत्सवामध्ये महिला केंद्रित समस्यांवरील चित्रपट दाखवून सक्षमीकरणाचा संदेश देत फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनलवर सात चित्रपट दाखवले जात आहेत.
ऑनलाईन चित्रपटांसोबतच, नोंदणीकृत आहारतज्ञ मीनल गाडा यांचे "महिलांसाठी खास आहार विषयक सूचनांवर भर देणारे तज्ज्ञांचे भाषण फिल्म्स डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या विशेष दिनाचे औचित्य साधून, महिला कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन पेडर रोड इथल्या संकुलात करण्यात आले आहे.

हे चित्रपट www.filmsdivision.org/DocumentaryoftheWeek वर आणि
YouTube चॅनल- https://www.youtube.com/user/FilmsDivision वर आज ((8 मार्च , 2022) रोजी दाखवले जात आहेत:
- विंग्स ऑफ डिझायर (59 Mins /2018 / प्रतिभा कौर पसरिचा)
- ड्रामा क्वीन्स (52 Mins / 2019 / सोहिनी दासगुप्ता)
- इनर व्हॉइस (5 Mins / 2016/ जिमी लूक)
- आय राईझ (52 Mins / 2019 / बेरन थोकछुम)
- द डे आय बिकम अ वुमन (35 Mins / 2019 / माऊपिया मुखर्जी)
- दिलेर अरुनिमा सिन्हा (5 Mins / 2017 / के. एस. श्रीधर )
- स्टॉप ऍसिड अटॅक (1.33 Mins / Music / 2019 /फराह खातून)
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1804092)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English