माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"आंतरराष्ट्रीय महिला दिन: सहा दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी साजरा करत आहेत

Posted On: 08 MAR 2022 7:28PM by PIB Mumbai

मुंबई, 8 मार्च 2022

 

60 च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन झालेली एक प्रमुख चित्रपट शिक्षण संस्था म्हणून, FTII अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा, देशातील सर्वात बहुरंगी आणि वैविध्यपूर्ण कथाकार तयार आणण्याचा विक्रम आहे. यामध्ये माजी विद्यार्थिनींचा समावेश आहे ज्यांनी नवीन प्रदेशांमध्ये प्रवेश केला आहे आणि चित्रपट निर्मितीमध्ये अग्रगण्य, नवोदित आणि निर्माते म्हणून योगदान दिले आहे. या माजी विद्यार्थिनींचे वैविध्यपूर्ण करिअर देखील चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगाच्या उत्क्रांतीशी सुसंगत आहे. FTII मध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, साउंड रेकॉर्डिंग, प्रोडक्शन डिझाईन, अभिनय आणि निर्मिती यांसारख्या स्पेशलायझेशनमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थिनींच्या प्रेरणा, आव्हाने आणि यश जाणून घेऊन ते साजरे करण्यासाठी, FTII आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक तयार करण्यात आले आहे ज्याचे शीर्षक आहे "बॅलन्सिंग द विस्डम ट्री-एफटीआयआय च्या माजी विद्यार्थिनींचा साहित्यसंग्रह".

प्रख्यात चित्रपट निर्मात्या अरुणा राजे पाटील आणि FTII च्या माजी विद्यार्थिनींनी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून पुस्तकाचे प्रकाशन केले. पुस्तकाच्या संपादक, गौरी दुर्गा चक्रवर्ती आणि इतर तीन माजी विद्यार्थीनी- रीना मोहन, गिसी मायकल आणि डोरोथी वर्मा पुस्तक प्रकाशन सोहोळ्याला उपस्थित होत्या. पुस्तकात तीन विभाग आहेत ज्यात माजी विद्यार्थ्यांमधील संभाषणे, वैयक्तिक विचार यांचा समावेश आहे परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 1965-2016 दरम्यान FTII मधून पदवी प्राप्त केलेल्या 503 महिलांच्या कार्याचा तपशील आहे. 1966 मध्ये पहिली महिला पदवीधर पार्वती मेनन यांच्यापासून ते 2021 मध्ये कानमध्ये पुरस्कार मिळालेल्या दिग्दर्शिका पायल कपाडिया यांच्यापर्यंतच्या चित्रपटातील प्रशिक्षणामागील प्रेरणा जाणून घेण्याची संधी वाचकांना मिळेल. चित्रपटावरील याआधीच्या कोणत्याही प्रकाशनात महिला चित्रपट निर्मात्यांचा  इतका व्यापक अनुभव मांडण्यात आलेला नाही.

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, श्रीमती अरुणा राजे पाटील यांनी माजी विद्यार्थिनींच्या कामगिरीची नोंद करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. पत्र सूचना कार्यालयाचे महासंचालक (पूर्व विभाग) श्री भूपेंद्र कैंथोला यांनी हे प्रकाशन प्रकाशित करण्यासाठी FTII आणि प्रकाशन विभागाच्या एकत्रित प्रयत्नांचे अभिनंदन केले. FTII चे रजिस्ट्रार, श्री सय्यद रबीहश्मी आणि सहयोगी प्राध्यापक, श्री विक्रम वर्मा हे पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते.

मानवी कथांच्या संग्रहांत मोठ्या प्रमाणावर लैंगिक समतोल आणणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. म्हणूनच, अभ्यासक आणि संशोधक दोघांनीही या अग्रगण्य संकलनाच्या सामग्रीमध्ये गुंतणे देखील महत्त्वाचे आहे. हे पुस्तक लैंगिक समानतेच्या पलीकडे जाण्याचा आणि लैंगिक समतोल निर्माण करण्याच्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त करते - आणि म्हणूनच बॅलन्सिंग द विस्डम ट्री असे शीर्षक आहे. या देशात प्रसारमाध्यमे आणि मनोरंजनाच्या वाढीसह, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अधिकाधिक कथा उदयास येतील आणि सामग्रीची विविधता निर्माण करण्यासाठी महिला कथाकार आणि व्यावसायिकांचे प्रशिक्षण महत्वाचे असेल. FTII हे अशा प्रशिक्षणासाठी पोषक स्थान आहे. हा संग्रह भविष्यातील तरुण महिलांना भूतकाळातील आव्हाने, जबाबदाऱ्या आणि कृत्ये यांची जाणीव करून देण्यासाठी एक अनुकूल मार्गदर्शक म्हणून काम करेल.

 

* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804086) अभ्यागत कक्ष : 277
Read this releasein: English , Bengali