संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिणी कमांड आवातर्फे महिला दिन 2022 साजरा

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2022 9:49PM by PIB Mumbai

 

समाजाप्रती महिलांचे निस्वार्थी समर्पण आणि योगदान यांची पोचपावती देण्याच्या उद्देशाने दक्षिणी कमांडमधील आवा अर्थात आर्मी वाईव्ह्ज संघटनेच्या वतीने 05 आणि 06 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील महिलांचे यश आणि समानता यांचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी  आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने, महिला कलाकारांना आणि उद्योजकांना पाठींबा देण्याचा एक प्रयत्न म्हणून दक्षिणी कमांड आवाने पुण्यातील एसजीएस मॉल येथे हस्तकलेच्या वस्तू आणि चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला दक्षिणी कमांड आवाच्या प्रदेशाध्यक्ष अनिता नैन उपस्थित होत्या.

या प्रदर्शनात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि उद्योजकांनी त्यांची उत्पादने सादर केली. या प्रदर्शनाने सहभागी महिलांना स्वावलंबन आणि क्षमता प्राप्त करण्याच्या उद्देशाने एक योग्य मंच उपलब्ध करून दिला. दक्षिणी कमांड आवाच्या प्रदेशाध्यक्षांनी या प्रसंगी सहभागी महिलांचे अभिनंदन केले आणि महिला सक्षमीकरण आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी दक्षिणी कमांड आवाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या प्रदर्शनात पुणे परिसरातील महिलांनी मॉलमधील या प्रदर्शनात सक्रियतेने  आणि उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे या उपक्रमाला मोठे यश लाभले.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1803245) आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English