दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागाने केले “गोवा पोस्टल प्रिमिअर लीग, सीझन-2” चे आयोजन
Posted On:
28 FEB 2022 9:47PM by PIB Mumbai
गोवा, 28 फेब्रुवारी 2022
गोव्याच्या टपाल विभागाने नुकतेच “गोवा पोस्टल प्रिमिअर लीग, सीझन-2”चे आयोजन केले. गोवा विभागातील टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषत्वाने आयोजित करण्यात आलेली ही टेनिस चेंडूने खेळवली गेलेली दोन दिवसांची स्पर्धा होती. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी गोवा विद्यापीठाच्या मैदानावर या स्पर्धेतले सामने खेळवण्यात आले आणि यामध्ये सर्व टपाल कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साखळी सामने खेळवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात आले. मैदानाच्या देखभालीसाठी आणि अल्पोपहार आणि श्रमपरिहाराची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती. म्हापसा आणि मडगावच्या पोस्टल कर्मचारी सहकारी पतसंस्था या स्पर्धेच्या प्रायोजक होत्या. मडगाव मुख्य टपाल कार्यालय आणि म्हापसा उप विभाग यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत झाली. यामध्ये मडगाव टपाल कार्यालयाने विजेतेपद पटकावले आणि प्रथम क्रमांकाचा चषक आणि फिरत्या चषकाचे मानकरी ठरले. गोवा विभाग टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. टपाल कर्मचाऱ्यांमध्ये या स्पर्धेमुळे खिलाडूवृत्ती आणि एकतेची भावना निर्माण होत असल्याने आणि ही स्पर्धा अतिशय महत्त्वाचा प्रोत्साहनकारक उपक्रम असल्याने भविष्यातही या स्पर्धेचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
* * *
R.Aghor/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801926)
Visitor Counter : 227