ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

जीईई लिमिटेडच्या कार्यस्थळांवर भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी टाकले छापे


जीईई लिमिटेडकडून  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले

Posted On: 26 FEB 2022 6:23PM by PIB Mumbai

 

भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस), मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 23.02.2022 रोजी मे.जीईई लिमिटेड या कंपनीच्या ठाणे जिल्ह्यात कल्याण-भिवंडी रस्त्यावर असलेल्या कार्यस्थळांवर सक्तवसुली संदर्भात शोध आणि जप्ती मोहीम राबवली. आयएस  15769 नुसार कार्बन किंवा कार्बन-मॅंगनीज पोलादाच्या गॅस शील्ड आणि सेल्फ-शिल्डेड मेटल वेल्डिंगसाठी फ्लक्स कोर्ड (ट्यूब्युलर) इलेक्ट्रोड्स संदर्भातील  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

जीईई लिमिटेडच्या आवारात छापे टाकल्यानंतर  या कंपनीने  दिनांक 12.03.2021 रोजी लागू करण्यात आलेल्या एस.ओ 1203 (ई) गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले. आयएस 15769 नुसार, वेल्डिंग वायर- फ्लक्स कोर्ड  वायर, 1.2 मिमी आणि 1.6 मिमी चा समावेश असलेले सुमारे = 174 बॉक्सेस (प्रत्येक बॉक्समध्ये 01 नग ) जप्त करण्यात आले

भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा  गैरवापर केल्यास 2016 च्या कायद्यानुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान 2,00,000 रुपये  दंडाची शिक्षा  किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. न्यायालयात  या गुन्ह्याबद्दल खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.मोठा नफा मिळवण्यासाठी  बनावट आयएसआय चिन्ह असलेली उत्पादने तयार करून  ग्राहकांना  विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनाला  आले आहे.

खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी http://www.bis.gov.in  या  भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देऊन उत्पादनावरील आयएसआय चिन्हाची  सत्यता तपासण्याची विनंती भारतीय मानक ब्युरोने नागरिकांना केली आहे. कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी,प्रमुख, एमयुबओ -II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बीआयएस, मानकालय, 9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 093. या पत्त्यावर संबंधितांना द्यावी, अशी विनंती देखील नागरिकांनी करण्यात आली आहे. hmubo2@bis.gov.in  या ईमेल आयडीवर देखील ई-मेलद्वारे अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801413) Visitor Counter : 174


Read this release in: English