दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा इथे 9 मार्च रोजी विभागीय स्तरावरील निवृत्तीवेतन आणि डाक अदालत

प्रविष्टि तिथि: 25 FEB 2022 7:04PM by PIB Mumbai

 

मुंबई-गोवा, दि. 25 फेब्रुवारी, 2022

गोवा विभागातल्या पणजी येथील वरिष्ठ अधीक्षक कार्यालयामध्ये दि. 9 मार्च, 2022 रोजी निवृत्ती वेतन आणि डाक अदालतीचे आयोजन केले आहे. या दिवशी सकाळी 11.00 वाजता निवृत्ती वेतन आणि दुपारी 12.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सक्षम प्राधिका-यांनी कळविले आहे. यावेळी पोस्टाच्या सेवा आणि निवृत्तीवेतनधारकांसंबंधी सार्वजनिक सदस्यांकडून तक्रारी ऐकून घेण्यात येतील.

ज्या टपाल सेवेविषयीच्या तक्रारींचा निपटारा होत नाहीत, अशा अनिर्णित तक्रारी आता डाक आणि निवृतीवेतन अदालतमध्ये उपस्थित  केल्या जाऊ शकतील.

डाक आणि निवृत्तीवेतन अदालतसाठी पुढील मुद्दे लक्षात घेण्यात येतील.

  1. ज्या तक्रारींचे उत्तर सहा आठवड्यांच्या आत मिळाले नाही, अशा तक्रारींची फक्त दखल घेतली जावू शकते.
  2. तक्रार पुढील अधिका-यांना संबोधित करण्यात यावी आणि व्यक्तिगत रितीने तक्रारी सोपविण्यात याव्यात किंवा एएसपी (मुख्यालय) वरिष्ठ अधीक्षक, डाक कार्यालय, गोवा विभाग, पणजी, 403001 यांना टपालाने पाठविण्यात याव्यात.
  3. एका अर्जाव्दारे एकच तक्रार दाखल करता येईल.
  4. मूळ तक्रार ज्या अधिका-याला संबोधित करण्यात आली आहे, त्या अधिका-याचे नाव/ पद, तसेच ती ज्या तारखेला सादर केली होती, त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
  5. तक्रार अर्ज मूळ प्रतिसह दि. 3मार्च, 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
  6. निवृत्ती वेतन आणि डाक अदालत दि. 9 मार्च, 2022 रोजी अनुक्रमे 11.00 आणि 12.00 वाजता वरिष्ठ अधीक्षक कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी, 403001 येथे तक्रारदार/निवृत्तीवेतनधारकाने स्वखर्चाने न्यायालयात हजर रहायचे आहे.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1801165) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English