शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी मुंबईच्या संकुलात जैवसुरक्षा स्तर-3 (BSL3) गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (GMP) लॅबच्या बांधकामासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी राज नायर निधी पुरवणार

Posted On: 24 FEB 2022 4:42PM by PIB Mumbai

मुंबई, 24 फेब्रुवारी 2022

 

मुंबई स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी मुंबई) जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभाग (BSBE) येथे अत्याधुनिक जैवसुरक्षा स्तर-3 (BSL3) गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (GMP) लॅबच्या बांधकामासाठी  27 जानेवारी 2022 रोजी, संस्थेचे  माजी विद्यार्थी  राज नायर (बी. टेक., मेटलर्जिकल आणि मटेरियल सायन्स इंजिनीअरिंग, 1971) आणि त्यांची  माजी विद्यार्थी संघटना आयआयटी  बॉम्बे अल्युमनी असोसिएशन  (IITBAA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर आयआयटी मुंबईचे  संचालक प्रा. सुभाषिश  चौधरी, देणगीदार . राज नायर आणि IITBAA च्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लता वेंकीताचलम यांनी स्वाक्षरी केली.  नायर यांनी या बांधकामासाठी आयआयटी मुंबईला भरीव देणगी दिली असून जीएमपी प्रणालीतील माजी विद्यार्थी आणि तज्ञ  अजित जावळे यांच्या मदतीने कार्यक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थापन केले जाणार आहे. नायर यांनी धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांच्या अनुभवाचा वापर करून गो-टू-मार्केट धोरणाच्या व्यावसायिक पैलूंवर संशोधकांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली   आहे.

जैव  विज्ञान आणि जैव अभियांत्रिकी  (बीएसबीई) विभागातल्या प्रस्तावित सुविधेमुळे  मानवी नैदानिक चाचण्यांसाठी आवश्यक सामुग्री तयार करून प्रयोगशाळेच्या टप्प्यापासून बाजारपेठेपर्यंत यशस्वी संशोधन शक्य होईल.  या सुविधेचा उपयोग बीएसबीई आणि कॅम्पसमधील इतर विभागांमधील संशोधक क्लिनिकल चाचण्यांसाठी नॅनोमटेरियल, टिश्यू-इंजिनिअर्ड ग्राफ्ट्स, CAR-T कन्स्ट्रक्ट्स, ड्रग नॅनोपार्टिकल्स इ. तयार करण्यासाठी करतील. आयआयटी मुंबईचे अनेक अध्यापक या क्षेत्रांमध्ये तज्ञ आहेत आणि जीएमपी लॅब त्यांचे  जीवनरक्षक संशोधन  बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात मदत करू शकते. या उपक्रमासाठी . भारत आणि आयआयटी मुंबई  अशी स्थाने बनतील जिथे संशोधनामुळे जनतेसाठी सर्वोत्तम आणि प्रभावी उपाय मिळतील जे  अधिक चांगल्या, स्वस्त आणि विद्यमान उपायांपेक्षा जलद 10 पट सुधारणा करतील   जेणेकरून उपचार  कठीण असलेल्या हजारो रुग्णांना फायदा होईल.

या भागीदारीबद्दल बोलताना, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिस चौधरी  म्हणाले, “संस्थेच्या बीएसबीई विभागामध्ये जीएमपी लॅबची निकडीची गरज होती आणि त्याकडे लक्ष दिल्याबद्दल आम्ही  नायर यांचे अत्यंत आभारी आहोत.  नायर यांच्या देणगीमुळे प्रयोगशाळेत उत्पादित उत्पादने बाजारात सहज उपलब्ध करून देण्याची आमची कल्पना साकार होईल  आणि लोकांसाठी जलद, चांगले आणि फायदेशीर संशोधन  व्यावहारिक वापरासाठी उपलब्ध होईल. या प्रयोगशाळेची स्थापना हे जगातील अव्वल  50 संस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक पाऊल आहे.”

या सहकार्यावर बोलताना  राज नायर म्हणाले, “ मी शिक्षण घेतलेल्या संस्थेचे ऋण फेडण्याचा  सर्वोत्तम मार्ग म्हणजे सामान्यांपर्यंत पोहचण्यास  कठीण वाटणाऱ्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावणे हा आहे. गरजूंना देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे  संशोधन प्रयत्न सुलभ करून लाखो लोकांचे जीवन वाचवण्यासाठी किफायतशीर दरात  वैद्यकीय उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. "

जैव  विज्ञान आणि जैव अभियांत्रिकी  (बीएसबीई) विभागाचे प्रमुख प्रा . रोहित श्रीवास्तव  आणि प्रा.  हिमांशू पटेल यांनी कॅम्पसमधील बीएसबीई सुविधेमध्ये जीएमपी लॅबमुळे  महत्त्वपूर्ण वाढ झाल्याचे नमूद केले  आणि म्हणाले, "आम्ही  राज नायर यांचे या औदार्याबद्दल आणि या जीएमपी सुविधेद्वारे स्वदेशी प्रयोगशाळेत संशोधन केलेली उत्पादने बाजारात आणण्याची त्यांची कल्पना याबद्दल आभार मानतो.  भारतातील कोणत्याही आयआयटीमधील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा आहे आणि क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात ती मदत करेल. "


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1800799) Visitor Counter : 201


Read this release in: English