कृषी मंत्रालय
आयसीएआर-सीसीएआरआय येथे पर्यावरण व्यवस्थेतील सेवांच्या विश्लेषणावर आधारित लघु अभ्यासक्रम
Posted On:
23 FEB 2022 6:43PM by PIB Mumbai
गोवा, 23 फेब्रुवारी 2022
"वैविध्यपूर्ण नारळ आणि सुपारी बागांमध्ये परिसंस्था सेवा विश्लेषण" या विषयावरील आयसीएआरचा लघु अभ्यासक्रम गोवा स्थित आयसीएआर-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था, येथे 21 फेब्रुवारी रोजी आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात सुरू करण्यात आला. आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात किनारपट्टीवरील कृषी परिसंस्थेमध्ये, विशेषतः नारळ आणि सुपारी बागांमधील परिसंस्था सेवांचे विश्लेषण आणि उत्पादकता आणि शाश्वत सुधारणा यावर भर दिला. तसेच त्यासाठी सहकार्यात्मक संशोधन कार्याचा विस्तार करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी किनारपट्टी भागातील शेतीबाबत उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले.
5 विविध राज्यांमधील आयसीएआर संस्था, राज्य कृषी/बागायती विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रांमधून 13 प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे आणि 13 ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
प्रधान शास्त्रज्ञ (बागायती) आणि अभ्यासक्रम संचालक डॉ व्ही अरुणाचलम यांनी अभ्यासक्रम आणि उद्दिष्टांची माहिती दिली. कृषी वैज्ञानिक डॉ व्ही परमेश, आणि अभ्यासक्रम समन्वयक यांनी सहभागी विद्यार्थी आणि आयोजकांचे स्वागत केले. वैज्ञानिक (कृषी वनीकरण) आणि अभ्यासक्रम समन्वयक डॉ. उथप्पा ए.आर यांनी आभार मानले.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800612)
Visitor Counter : 176