आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केन्द्र शासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्यावत माहिती


राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना 172.68 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे अजूनही 10.98 कोटींहून अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयुक्त मात्रा शिल्लक.

Posted On: 23 FEB 2022 9:11AM by PIB Mumbai

देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.  देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा सार्वत्रिकीकरणाचा  नवा टप्पा  21 जून, 2021 पासून सुरु झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे  या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75% लस खरेदी करून या लसीचा राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 23rd February 2022)

 

SUPPLIED

 

1,72,68,90,400

 

BALANCE AVAILABLE

 

 

10,98,57,832

 

केंद्र सरकारने आतापर्यंत  172.68  (1,72,68,90,400) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात  सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 

 

10.98  (10,98,57,832) कोटी  न वापरलेल्या उपयुक्त  मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

 

****

Jaydevi PS/ VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800459) Visitor Counter : 155