माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय विज्ञान सप्ताहानिमित्त प्रकाशन विभागाच्या वतीने मुंबईत विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
पुस्तकांच्या खरेदीवर 10 ते 90 टक्के सूट
Posted On:
21 FEB 2022 4:48PM by PIB Mumbai
मुंबई, 21 फेब्रुवारी 2022
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान सप्ताहानिमित्त मुंबईतील पार्ले पूर्व भागातील साठे महाविद्यालय येथे विशेष पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 22 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सकाळी 10.30 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत हे पुस्तक प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.
विज्ञान सप्ताहानिमित्त प्रकाशन विभागाची विज्ञान विषयक आणि इतर अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके वाचकांना विशेष सवलतीच्या दरात या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. प्रदर्शन काळात पुस्तकांच्या खरेदीवर किमान 10 ते कमाल 90 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेश आहे.
प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा, गांधी साहित्य, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे यांचा संंग्रह प्रकाशन विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
* * *
(सोर्स : प्रकाशन विभाग, मुंबई) | S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800061)
Visitor Counter : 214