माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरोजिनी नायडू यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त फिल्म्स डिव्हिजनची त्यांना आदरांजली
सरोजिनी नायडू यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा चरित्रपट दाखवण्यात येणार
Posted On:
13 FEB 2022 2:46PM by PIB Mumbai
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सेनानी आणि भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या सरोजिनी नायडू यांना 13 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त फिल्म्स डिव्हिजन आदरांजली वाहत आहे. त्यांच्यावरील चरित्रपट फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि युट्युब चॅनलवर प्रसारित केला जात आहे. या चित्रपटाचे प्रसारण हे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सोहळ्याचा हा एक भाग आहे.
सरोजिनी नायडू - द नाईटिंगेल ऑफ इंडिया (1975/B.D. गर्ग) हा माहितीपट एक महान स्वातंत्र्यसैनिक, कवयित्री आणि भारतीय राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो. विशेष म्हणजे या चित्रपटात आशियाई संबंधी परिषदेला संबोधित करतानाचा सरोजिनी नायडू यांचा आवाज आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी कृपया https://filmsdivision.org/ ला भेट द्या आणि @ “Documentary of the Week” वर क्लिक करा किंवा फिल्म्स डिव्हिजनचे युट्यूब चॅनेल https://www.youtube.com/user/FilmsDivision ला फॉलो करा.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798042)
Visitor Counter : 195