माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विविध भारतीय भाषांमधील कथेवर आधारित चित्रपटांच्या निर्मिती/सह-निर्मितीसाठी अर्ज करण्याचे एनएफडीसीचे आवाहन


अर्ज पाठवण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत

Posted On: 10 FEB 2022 6:25PM by PIB Mumbai

मुंबई, 10 फेब्रुवारी 2022

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांची निर्मिती' या योजनेच्या अंतर्गत ,कथेवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीच्या अनुषंगाने निधीसाठी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएफडीसी) अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.

हे अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवता येतील.

इच्छुक अर्जदार https://nfdcindia.com/apply-now/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात आणि निर्मितीसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे अर्ज भरण्याच्या सर्व आवश्यकता पूर्ण करू शकतात. संपूर्ण अर्जाची छापील प्रत , नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, 6 वा मजला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया इमारत , डॉ. अॅनी बेझंट रोड, नेहरू सेंटर, वरळी, मुंबई – 400018 या पत्त्यावर मुंबई कार्यालयात पाठवणे अनिवार्य आहे.

या व्यतिरिक्त, अर्जदार त्यांचे अर्ज नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई येथील प्रादेशिक कार्यालय आणि तिरुवनंतपुरम येथील शाखा कार्यालयात पाठवू शकतात. या कार्यालयांचा पत्ता nfdcindia.com/contact-us/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एनएफडीसी चित्रपट निर्मितीसाठी असलेल्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतीय चित्रपटातील वैविध्य प्रतिबिंबित करणाऱ्या कथेवर आधारित चित्रपटांची निर्मिती आणि सह-निर्मिती करते. एनएफडीसी चित्रपट निर्मात्यांच्या पदार्पणाच्‍या चित्रपटाची 100% निर्मिती करून त्यांना प्रोत्‍साहन आणि पाठिंबा देते. तसेच भारत आणि परदेशातील स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांच्या सहकार्याने आणि चांगल्या आशयाचे चित्रपट तयार करण्याचा अधिकार कायम ठेवण्यासाठी सह-निर्माता म्हणून चित्रपट निर्मितीचा प्रकल्प देखील हाती घेते.

अधिक चौकशी करण्यासाठी filmproduction@nfdcindia.com वर लिहा किंवा 022 66288 288 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

 S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797339) Visitor Counter : 177


Read this release in: English