वस्त्रोद्योग मंत्रालय
महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना देण्यात आलेले अनुदानाचे पाठबळ
Posted On:
09 FEB 2022 5:35PM by PIB Mumbai
मुंबई/नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2022
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि महाराष्ट्रातल्या लहान उत्पादक उद्योगांसह देशभरातील वस्त्रोद्योगांना सुधारित तंत्रज्ञान अद्ययावतीकरण निधी योजना (एटीयूएफएस) आणि पॉवरटेक्स इंडिया यांसारख्या योजनांच्या माध्यमातून अनुदानाचे पाठबळ दिले जाते. सुधारित तंत्रज्ञान अद्ययावतीकरण निधी योजने अंतर्गत मंत्रालयाने तयार कपडा उद्योगातील आणि तांत्रिक वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञान अद्ययावतीकरणासाठी 15% दराने 30 कोटी रुपयांच्या कमाल मर्यादेसह भांडवली गुंतवणूक अनुदान (सीआयएस) मंजूर केले आहे. विणकाम, प्रक्रिया, ज्यूट, रेशीम आणि हस्तमाग या क्षेत्रांना 10% दराने कमाल 20 कोटी रुपयांच्या मर्यादेसह सीआयएस देण्यात आले आहे. ही अनुदाने वैयक्तिक उद्योगांना जानेवारी 2016 ते मार्च 2022 या काळात अंमलबजावणीसाठी देण्यात आली आहेत.
पॉवरटेक्स इंडिया योजनेंतर्गत इन सिटू अद्ययावतीकरण, यार्न बँक योजना आणि वर्क शेड प्रकल्पांनां पॉवरलूम विकेंद्रीकरणाला मजबुती देण्यासाठी एप्रिल 2017 ते मार्च 2021 दरम्यान सहाय्य देण्यात आले आहे.
सुधारित तंत्रज्ञान अद्ययावतीकरण निधी योजना (एटीयूएफएस) अंतर्गत 314.80 कोटी रुपये आणि पॉवर टेक्स इंडियांतर्गत 40.51 कोटी रुपये महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना वर नमूद केलेल्या कालावधीसाठी देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना एटीयूएफएस आणि पॉवर टेक्स अंतर्गत देण्यात आलेले पाठबळ
Sl. No.
|
Name of the Scheme
|
Number of units/ beneficiaries
|
Amount of assistance (in Rs. crore)
|
1.
|
Amended Technology Upgradation Fund Scheme (ATUFS)
|
785
|
314.80
|
2.
|
PowerTex India Scheme
|
In situ scheme – 3,351
|
30.71
|
Work shed projects – 18
|
7.01
|
Yarn Bank projects - 11
|
2.80
|
केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1796899)
Visitor Counter : 307